Tuesday, April 8, 2025
Home मराठी राजेश्वरी खरातच्या लटक्या झटक्यांनी चोरली चाहत्यांची मनं, व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

राजेश्वरी खरातच्या लटक्या झटक्यांनी चोरली चाहत्यांची मनं, व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. का नाही आठवणार? आता आलं ना ध्यानात!! आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या शालूबद्दल. अत्यंत साधीभोळी, दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी, तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या चित्रपटापेक्षा सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरूनच खूपच चर्चेत असते. आता देखील तिचा एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

तिने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. यामध्ये तिचा टी-शर्ट एक वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसत आहे. तिचा हा टी-शर्ट बऱ्यापैकी बॅकलेस दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (rajeshwari kharat’s dance video viral on social media)

या व्हिडिओमधील तिच्या दिलकश अदा आणि बोल्ड अंदाज पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तिच्या चाहत्यांना नेहमीप्रमाणेच तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. चाहते सातत्याने कमेंट करून या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.

राजेश्वरीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ‘रेड लाईट’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट वैश्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे आता सगळेजण या चित्रपटात तिची भूमिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा