Saturday, June 29, 2024

ना शाहरुख, ना सलमान… भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण? नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का

बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्यांप्रमाणे आता दक्षिण भारतीय स्टारही त्यांच्या मानधनाबाबत चर्चेत येत आहेत. सलमान खान, शाहरुख खान, थलपथी विजय असे अनेक स्टार आहेत जे प्रत्येक चित्रपटासाठी 100 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मानधन घेतात. मात्र, आता 72 वर्षीय सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांना मागे टाकले आहे. रजनीकांत यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी 260ते270 कोटी रुपये मानधन घेतले आहे. यामुळे ते आशियातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनले आहेत.

रजनीकांत (Rajinikanth)यांच्या मागील चित्रपट ‘जेलर’ हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने 650 कोटी रुपयांची कमाई केली होती. या यशामुळे रजनीकांत यांनी त्यांच्या फीमध्ये वाढ केली आहे. रजनीकांत यांचे आगामी चित्रपट ‘थलाइवर 171’ लोकेश कनागराज दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्स करणार आहे. या चित्रपटाचे बजेट 225 कोटी रुपये आहे.

रजनीकांत यांच्या या कामगिरीमुळे त्यांना अभिनय क्षेत्रात एक नवी ओळख मिळाली आहे. ते आता केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक बनले आहेत. सुपरस्टार रजनीकांतचे सध्या दोन मोठे प्रोजेक्ट आहेत आशियातील यादीत रजनीकांत यांनी अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने फीच्या बाबतीत जॅकी चॅनला मागे टाकले होते. रजनीकांत यांच्या या मानधनाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. दक्षिण भारतीय चित्रपट सध्या जगभरात लोकप्रिय होत आहेत. यामुळे दक्षिण भारतीय कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात मानधन मिळत आहे.

‘थलाइवर 171’ बद्दल सांगायचे तर, हा चित्रपट सन पिक्चर्स निर्मित करत आहे. रजनीकांतचा ‘जेलर’ही याच बॅनरखाली बनवण्यात आला होता. हा चित्रपट 2024च्या अखेरीस किंवा 2025च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘जेलर’ने बॉक्स ऑफिसवर 650 कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन करून सर्वांना चकित केले आणि आता हा चित्रपट ओटीटीवरही लोकप्रिय आहे. (Rajinikanth earns more than Salman Khan Shahrukh Khan Thalapathy Vijay)

आधिक वाचा-
‘टायगर 3’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार?, दिवाळीत भाईजानची धमाकेदार एन्ट्री
ब्रेकिंग! प्रसिद्ध गायकाला अटक; बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप

हे देखील वाचा