सुपरस्टार रजनीकांतचे(Rajinikanth) चाहते जगभर पाहायला मिळतात. केवाळ साऊथ सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचे लाखो चाहते आहेत. याच चाहत्यांसाठी खुशखबर घेऊन आलो आहोत. तब्बल २४ वर्षानंतर रजनीकांत बॉलिवूडमध्ये कमबॅक(Rajinikanth Bollywood Comeback) करणार आहेत.
रजनीकांत यांनी प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला याच्यासोबत हातमिळवणी करत त्यांचा आगामी चित्रपट साईन केला आहे. स्वतः साजिद नाडियादवाला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नाडियादवाला यांनी रजनीकांत (Rajinikanth) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
हा फोटो पोस्ट करताना रजनीकांत यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘महान अभिनेते रजनीकांत सरांसोबत चित्रपट करणे हा खरा सन्मान आहे! आम्ही एकत्र या अविस्मरणीय प्रवासाची तयारी करत आहोत!’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे चाहत्यांची आतुरता शिगेला पोहचली आहे.
It's a true honour to collaborate with the legendary @rajinikanth Sir! Anticipation mounts as we prepare to embark on this unforgettable journey together!
– #SajidNadiadwala @WardaNadiadwala pic.twitter.com/pRtoBtTINs— Nadiadwala Grandson (@NGEMovies) February 27, 2024
साजिद नाडियादवाला यांनी सलमान खानचा चित्रपट ‘किक’ दिग्दर्शित केला होता. त्यांनी शेवट अभिनेता वरुण धवन याचा ‘बवाल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. नाडियादवाला यांच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी रजनीकांत(Rajinikanth) यांच्या भूमिकेबद्दल अनेक सवाल उपस्थित होत आहेत. आगामी चित्रपट कोणता? अन् रजनीकांत कोणत्या भूमिकेत दिसणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना उपस्थित झाले आहेत.
साऊथ व्यतिरिक्त रजनीकांत यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्येही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. पण, गेल्या २४ वर्षांपासून रजनीकांत यांनी एकही बॉलिवूड चित्रपट केला नाही. मात्र, आता रजनीकांत यांनी आपला २४ वर्षांचा बॉलीवूडचा वनवास संपवण्याचा निर्णय घेतला आहे.(Rajinikanth Bollywood Comeback) रजनीकांत आता पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बॉलिवूडमध्ये त्यांचा शेवटचा ‘बुलंदी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘बुलंदी’ या चित्रपटात अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत अनिल कपूर, रवीना टंडन आणि रेखा मुख्य भूमिकेत होते. यांनतर रजनीकांत यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये काम केले नाही.
हेही वाचा:
…म्हणून रकुल प्रीतने मेहेंदी सेरेमनीच्या लेहेंग्यासाठी डिझायनरचे मानले आभार
Vikrant Massey दिसणार नव्या भूमिकेत; ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचा टिझर लाँच