Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड भारीच ना! आज प्रदान होणार रजनीकांत यांना मानाचा ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’

भारीच ना! आज प्रदान होणार रजनीकांत यांना मानाचा ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’

दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार रजनीकांत आपल्या दमदार अभिनयामुळे अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि आता रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाईल. रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणा झाल्यापासून त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. ते आनंदाने आणि रोमांचितपणे ट्विटरवर त्यांच्या आवडत्या स्टारसाठी विविध पोस्ट टाकत आहेत आणि त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करत आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, या पुरस्कारासाठी रजनीकांत यांच्या नावाची घोषणा एप्रिलमध्येच करण्यात आली होती. रजनीकांत यांना हा पुरस्कार सोमवारी (२५ ऑक्टोबर) देण्यात येणार आहे. केंद्र सरकार रजनीकांत यांना २०२० च्या ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करेल. त्यांनी सांगितले की, सोमवार हा त्यांच्यासाठी एक खास प्रसंग असेल, जेव्हा त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान मिळेल.

रविवारी दिल्लीला रवाना झालेल्या रजनीकांत यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “उद्याचा दिवस माझ्यासाठी खास कारणांमुळे खास बनला आहे. लोकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मला भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जात आहे.” त्यांच्यासाठी हा दिवस आणखी खास असेल, कारण त्यांची मुलगी सौंदर्या व्हॉइसवर आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. जे लोकांसाठी एक ‘उपयुक्त ॲप’ असेल. रजनीकांत यांचा पुढचा ऍक्शन चित्रपट ‘अन्नाथे’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांत हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. ते केवळ दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमुळेच प्रसिद्ध नाही, तर त्यांना जागतिक आकर्षण आहे. हेच कारण आहे की, अमेरिका आणि यूएई सारख्या देशांमध्ये त्याचे फॅन फॉलोइंग आणि स्टारडम वेगळ्या पातळीवर आहेत. ५० वर्षांहून अधिक काळ ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.

रजनीकांत यांनी ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘बाशा’, ‘शिवाजी द बॉस’ आणि ‘एंथिरन’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. रजनीकांत यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी २००० मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषणने भारत सरकारने सन्मानित केले आहे. रजनीकांत यांना त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘थलाइवर’ मानले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यावर्षी ‘हे’ सेलेब्रिटी साजरे करणार त्यांचे पहिले करवा चौथ

-‘माझा या गोष्टींवर विश्वास नाही’, म्हणत रिया कपूरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हे देखील वाचा