Sunday, June 23, 2024

रजनीकांत २५ ऑक्टोबर रोजी होणार ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित, ट्विट करत त्यांनी व्यक्त केला आनंद

प्रतीक व्यक्तीलाच आपल्या कामाबद्दल वरिष्ठांकडून किंवा ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांच्याकडून शाबासकीची थाप पाहिजे असते. कौतुकामुळे काम करण्याचा जोश, उमेद, ऊर्जा आनंद वेगळाच असतो. अधिक जोमाने आपले काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. कलाकरांना देखील ही कौतुकाची थाप खूप आवश्यक असते. विविध पुरस्कारांच्या रूपाने त्यांना ही थाप मिळते. सिनेसृष्टीमधे प्रत्येक पुरस्काराचे एक वेगळेच महत्व आहे. ‘फिल्मफेयर’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ हे मनोरंजन विश्वातील मानाचे आणि मोठ्या सन्मानाचे अवॉर्ड्स आहे. मात्र याहीपेक्षा मोठा पुरस्कार आहे ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’. मनोरंजन विश्वात अभूतपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात सुपरस्टार रजनीकांत यांना यावर्षीचा एकावन्नावा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना २५ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपटांमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. या संदर्भात रजनीकांत याची ट्विटरवर ट्विट करत त्यांच्या भावना आणि आनंद व्यक्त केला आहे.

रजनीकांत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “उद्याचा दिवस माझ्यासाठी दोन कारणांमुळे खूप महत्वाचा दिवस आहे. एक तर उद्या मला दादासाहेब पुरस्कार मिळत आहे, तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच भारत सरकारकडून मला हा पुरस्कार प्रदान केला जात आहे.”

रजनीकांत यांनी त्यांचा आनंदाचे दुसरे कारण सांगताना लिहिले, “माझी मुलगी सौंदर्य विशगनने तिच्या प्रयत्नांनी ‘हूट’ ऍप्प तयार करण्याचे काम हातात घेतले असून, हे ऍप्प ती जगासमोर आणत आहे. लोकं आता त्यांच्या आवाजच्या रूपाने त्यांचे विचार व्यक्त करू शकतात. इच्छा आणि विचारांसह ते त्याच्या आवडीच्या भाषेत लिहिलेल्या रूपात व्यक्त करू शकतात. मला माझ्या आवाजात या अभिनव, उपयुक्त आणि आपल्या पद्धतीचे ‘हूट’ ऍप्प लाँच करताना खूप आनंद होत आहे.”

आतापर्यंत लता मंगेशकर, दिलीप कुमार, प्राण, यश चोप्रा, देव आनंद, आशा भोसले, अमिताभ बच्चन आदी अनेक दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा