Monday, July 1, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नवीन सिनेमाची घोषणा, फर्स्ट लूकमध्ये ‘थालयवी’ स्वॅग पाहून फॅन्स झाले वेडे

दक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे नेहमी या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचा ऐश्वर्याचा आणि धनुषचा घटस्फोट झाला. आता पुन्हा एकदा थालयवी रजनीकांत एका मोठ्या कारणामुळे प्रकाशझोतात आले आहे. रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. ‘थालयवी १६९’ (Thalaivar 169) हे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव असून, नेल्सन दिलीप कुमार (Nelson Dilip Kumar) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सोशल मीडियावर एक कडक व्हिडिओ शेअर करत रजनीकांत यांच्या नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आली. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये संगीतकार अनिरुद्ध आणि दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार काळ्या रंगाच्या कोट आणि पॅण्टमध्ये दिसत असून ते स्टायलिश पोझ देत आहे. तर रजनीकांत हे नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वॅगमध्ये खुर्चीवर बसलेले दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नक्कीच सर्वात जास्त भाव खाऊन जात त्यानी लाईमलाइट मिळवले आहे.

हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

रजनीकांत हे ‘अन्नाथे’ सिनेमात अखेरचे दिसले होते. हा सिनेमा दिवाळीच्या काळात प्रदर्शित झाला होता.या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा मुख्य भूमिकेत होती तर कीर्ती सुरेशने राजनीकांत यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला घेऊन समीक्षण आणि प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा होती, मात्र प्रदर्शनानंतर सिनेमाला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. रजनीकांत यांचा सिनेमा म्हणजे त्यांच्या फॅन्ससाठी पर्वणीच असते. त्यांचा सिनेमा म्हणजे फॅन्ससाठी कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो. त्यामुळे फॅन्स नेहमीच रजनीकांत यांच्या सिनेमाची आतुरतेने वाट बघत असतात. सत्तरी पार केलेल्या रजनीकांत यांची क्रेझ आजही कायम आहे. त्यांचे सिनेमे आजही तुफान गाजतात.

रजनीकांत यांनी ‘अपूर्वा रागनगाल’ या सिनेमापासून त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला काही नकारात्मक भूमिका केल्या. एसपी मुथुरमन यांच्या ‘भुवन ओरु केल्विकुरी’ सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती. साऊथ इंडस्ट्री गाजवत असताना त्यांनी ‘अंधा कानून’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे त्यांनी ‘हम’, ‘मेरी अदालत’, ‘जान जॉनी जनार्दन’, ‘भगवान दादा’, ‘दोस्ती दुश्मनी’, ‘इंसाफ कौन करेगा’, ‘असली नकली’, ‘हम’, ‘खून का कर्ज’, ‘क्रांतिकारी’, ‘अंधा कानून’, ‘चालबाज’, ‘इंसानियत का देवता’, ‘रॉबोट’ आदी बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

हेही वाचा-

हे देखील वाचा