राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटात दिसणार किंग खान; सोबतच झळकणार या ‘तीन’ प्रसिद्ध अभिनेत्रीही


सध्या बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आदित्य चोप्राच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट शाहरुख खानचा सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असेल. या चित्रपटाशिवाय शाहरुख खान इंडस्ट्रीतील अनेक बड्या दिग्दर्शकांशी सतत चर्चा करत आहे. यापैकीच एक दिग्दर्शक राजकुमार हिरानी देखील आहेत, ज्यांच्या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान एका पंजाबी मुलाची भूमिका साकारताना दिसणार सांगण्यात आले होते. एका सुत्राने फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, “राजकुमार हिरानी यांचा पुढचा चित्रपट इमिग्रेशन, पंजाब आणि कॅनडा या दोन देशांमधील एका माणसाचा व त्याच्या कुटुंबाचा हा प्रवास याबद्दलची एक सोशल कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाची तयारी सध्या सुरू झाली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री असणार आहेत त्यामध्ये काजोल, तापसी पन्नू आणि विद्या बालन या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमात या तिन्ही अभिनेत्रींपैकी काजोल ही शाहरुख खानच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, तापसी पन्नूने एका पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे, जी या भूमिकेत या कथानकाला सीमा पार जाऊन कव्हर करणार आहे. या चित्रपटात तिसर्‍या महिलेच्या भूमिकेसाठी विद्या बालनशी चर्चा सुरू आहे. या चित्रपटात विद्या बालन अभिनेत्याला त्याच्या प्रवासात मदत करताना दिसणार आहे. (kajol vidya balan taapsee pannu will be seen with shah rukh khan in rajkumar hiranis next film read latest bollywood news)

विशेष म्हणजे, विद्या बालनला यापूर्वी शाहरुख खानच्या चित्रपटासाठी कधीच संपर्क साधला गेला नव्हता. ‘शेरनी’ नामक चित्रपटामधील विद्याच्या अभिनयाने प्रभावित होऊन राजकुमार हिरानी यांना असे वाटले, की विद्या या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. शाहरुख खान आणि काजोलला पुम्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी निर्माते उत्साहित आहेत. या दोघांनी अखेरच्या वेळेस रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ चित्रपटात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वाढदिवशी क्रिती सेननने चाहत्यांना केले खुश; एवढ्या धावपळीतही दिली त्यांना सेल्फी

-कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया

-या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


Leave A Reply

Your email address will not be published.