Wednesday, June 3, 2026
Home बॉलीवूड ‘या’ लक्झरी हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार राजकुमार अन् पत्रलेखा, एका रात्रीचे भाडे ऐकून उंचावतील तुमच्याही भुवया

‘या’ लक्झरी हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार राजकुमार अन् पत्रलेखा, एका रात्रीचे भाडे ऐकून उंचावतील तुमच्याही भुवया

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र सनई चौघडे ऐकू येत आहेत. रणबीर कपूर-आलिया भट्ट तसेच कॅटरिना विकी कौशल सोबत अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची गडबड देखील चालू आहे. अनेक वर्षांपासून ते दोघे रिलेशनमध्ये आहेत. आता त्यांनी त्यांचे हे नाते पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही येत्या काही दिवसांतच लग्नबंधनात अडकणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार राजकुमार आणि पत्रलेखा ‘द ओबेरॉय सुखविला स्पा रिसॉर्ट’मध्ये लग्न करणार आहेत.

राजकुमार आणि पत्रलेखा ज्या रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत ते एक लक्झरी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्रायव्हेट पूल, आयुर्वेदिक प्रोग्रॅम आणि सिझनर कुशन आहेत. या हॉटेलमध्ये चार प्रकारच्या खोल्या आहेत. त्यांची किंमत वेगवेगळी आहे. प्रीमियम रूम येथील सगळ्यात स्वस्त आहे. ज्याची किंमत ३७, ५०० रुपये एवढी आहे. यासोबतच हॉटेलमध्ये एक रॉयल फॉरेस्ट देखील आहे. ज्याची किंमत ७५ हजार एवढी आहे. लक्झरी विला आणि प्रायव्हेट पूल आहे ज्याची किंमत २ लाख रुपये एवढी आहे. आणखी एक कोहिनूर विला आहे ज्याची एका रात्रीची किंमत ६ लाख एवढी आहे. (Rajkumar Rao and patralekhaa to marry in this chandigarh luxury hotel)

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. त्यांनी केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि जवळच्या मित्राच्या उपस्थितीत हा सोहळा उरकला आहे. यावेळी राजकुमारने गुडघ्यावर बसून रोमँटिक अंदाजात पत्रलेखाला रिंग घातली आहे. त्यांच्या साखरपुड्याचे हे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले आहेत. तसेच तो लग्नात देखील तिला एक खास गिफ्ट देणार आहे. त्याने आजपर्यंत पत्रलेखाला अनेक पत्र लिहिली आहेत. तो ती सगळी पत्र लग्नाच्या दिवशी तिला गिफ्ट करणार आहे.

राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या ६ वर्षापासून रिलेशनमध्ये आहेत. अनेकवेळा सोशल मीडियावर ते त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करताना दिसतात. मागील अनेक दिवसापासून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. अशातच त्यांच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा