बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नानंतर मुंबईला परत आले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मुंबईला येताना पॅपराजींनी त्यांना मुंबई विमानतळावर स्पॉट केले आहे आणि काही फोटो काढले आहेत. या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पत्रलेखा लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्यांचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. तर काहीजण तिला तिच्या साडीमुळे ट्रोल करत आहेत.
पत्रलेखाने जी साडी नेसली आहे त्या साडीचा प्राईज टॅग काढायला विसरली आहे. त्यामुळे तिला खूप ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की, “प्राईज टॅग काढून तरी साडी घालायची.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “प्राइज टॅग तसाच आहे.” अशाप्रकारे तिला ट्रोल करत आहेत. (Rajkumar rao wife patrlekhaa forgot to remove the tag from her saree)
मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये फोटोग्राफर पत्रलेखाला असे काही म्हणतो, जे ऐकून सगळेच हसायला लागतात. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर तिला ‘वहिनी’ असा आवाज देतो. हे ऐकून ती लाजते आणि राजकुमारला म्हणते की, “तो मला वहिनी म्हणत आहे.” हे ऐकून राजकुमार हैराण झाला आणि ते दोघेही हसू लागले.
राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नाच्या आधी ११ वर्ष रिलेशनमध्ये होते. दोघांनी १५ नोव्हेंबर रोजी चंडीगडमध्ये लग्न केले आहे. त्यांनी त्यांच्या जवळेचे काही मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले. त्या दोघांनी २०१४ मध्ये ‘सिटीलाईट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांची मैत्री झाली आणि त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य