Wednesday, April 16, 2025
Home बॉलीवूड …आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

मागील पूर्ण आठवडा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्या लग्नाची धावपळ चालू होती. अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या आधीपासूनच त्याच्या लग्नाची बॉलिवूडमध्ये चर्चा चालू होती.

अनेक वर्ष राजकुमार आणि पत्रलेखा रिलेशनमध्ये होते. अखेर त्यांनी लग्न केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. दोघांनी लग्न तर केले परंतु आता लग्नानंतर ते दोघे हनिमूनला कुठे आणि कधी जाणार आहेत? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याबाबत एक अपडेट समोर आली आहे. माध्यमातील काही वृत्तांनुसार राजकुमार आणि पत्रलेखा सध्या हनीमूनला जाणार नाहीत.

याचे कारण म्हणजे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘भिड’ या चित्रपटाची शूटिंग लखनऊमध्ये होणार आहे. लग्नानंतर लगेच राजकुमार लखनऊला ‘भिड’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा त्याच्या या चित्रपटासाठी खूप उत्साहित आहेत.

असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट शूट करण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर हा महिना उत्तम आहे. अनुभव सिन्हा यांनी राजकुमार राव याला या चित्रपटासाठी विचारले तेव्हा त्याने यासाठी नाही म्हटले नाही. (Rajkunar rao to kick off bheed in Lucknow, before going honeymoon with patralekhaa)

‘भिड’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यावर राजकुमार राव आणि पत्रलेखा हनिमूनला जाणार आहेत. या चित्रपटात राजकुमार राव हा अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. तसेच राजकुमार आणि भूमी हे दोघे ‘बधाई हो’ या चित्रपटात देखील एकत्र दिसणार आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Jai Bhim: चित्रपटावरून झालेल्या वादामुळे सूर्याला मिळतायत धमक्या, घराबाहेर पोलीस तैनात

-सरकारचा मोठा निर्णय! पुनीत राजकुमारला मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

-पूजा हेगडे मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो शेअर करत म्हणाली, ‘एक सामान्य मुलगी…’

हे देखील वाचा