Jai Bhim: चित्रपटावरून झालेल्या वादामुळे सूर्याला मिळतायत धमक्या, घराबाहेर पोलीस तैनात


ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर २ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील सीन्सवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीये. नुकतीच वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी अभिनेता सुर्या, अभिनेत्री ज्योतिका, ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि ‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांनी समाजाची माफी मागावी आणि ते सर्व सीन काढून टाका, जी मानहानीकारक आहेत, असे म्हटले आहे.

सूर्याला मिळतायत धमक्या
नुकसानभरपाई म्हणून आठवडाभरात पाच कोटी रुपयांची मागणी केली जात आहे. त्याचवेळी, चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप घेत लोक अभिनेत्याला धमकावत असल्याने, सूर्याच्या घरी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सध्या त्याच्या सुरक्षेसाठी त्याच्या टी नगर येथील घराबाहेर शस्त्रांसह पाच पोलीस तैनात आहेत. (jai bhim controversy five police personnel are deployed with arms outside actor surya house as he is getting threats)

या चित्रपटात इरुलर समुदायाची जमात आणि त्यांना कोठडीत कसे छळले गेले, याचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटात, प्रकाश राज एका माणसाला हिंदीत बोलल्याबद्दल कानाखाली मारताना दाखवले आहेत, त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षक नाखुश आहेत. पाठवलेल्या नोटीसमध्ये एका कॅलेंडरवर अग्नी कुंडम दिसत असलेल्या सीनचाही उल्लेख आहे. वास्तविक, अग्नि कुंडम हे वाण्यारांचे प्रतीक आहे. पाठवलेल्या नोटीसमध्ये, निर्मात्यांनी जाणूनबुजून कॅलेंडर ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, राजकन्नूला त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे पात्र हेतुपुरस्सर वन्नियार जातीचे असल्याचे म्हटले गेले आहे.

यानंतर सुर्याने एक निवेदन जारी केले आहे की, त्यांचा चित्रपट आणि त्यांचा कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. ज्यानंतर सुर्याच्या चाहत्यांनी जय ‘भीमच्या टीम’ला पाठिंबा देण्यासाठी ट्विटरवर #WeStandWithSuriya ट्रेंड करण्यास सुरुवात केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे


Latest Post

error: Content is protected !!