Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड प्रियदर्शन यांच्या ‘कमी शिक्षण’ वक्तव्यावर राजपाल यादव झाले व्यक्त; म्हणाले, ‘टॅलेंटच महत्त्वाचं असतं’

प्रियदर्शन यांच्या ‘कमी शिक्षण’ वक्तव्यावर राजपाल यादव झाले व्यक्त; म्हणाले, ‘टॅलेंटच महत्त्वाचं असतं’

दिग्दर्शक प्रियदर्शन (Priydarshan) यांच्या ‘कमी शिक्षण’ या वक्तव्यावरून अभिनेता राजपाल यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. अलीकडेच चेक बाऊन्स प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल पुन्हा चर्चेत आले आहेत.

प्रियदर्शन यांनी त्यांच्या अडचणींचे कारण ‘कमी शिक्षण’ असल्याच म्हटल्यान राजपाल नाराज झाल्याच समोर आल. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितले की ते अशिक्षित नाहीत, तर ते National School of Drama चे पदवीधर आहेत आणि आपल्या शिक्षणाचा त्यांना अभिमान आहे.

ई-टाइम्सशी बोलताना राजपाल म्हणाले की, ते प्रियदर्शनजींचा खूप सन्मान करतात; मात्र त्यांनी असे वक्तव्य का केले हे समजत नाही. चित्रपटसृष्टीत काम करताना कोणीही आपली पदवीची कागदपत्रे सेटवर घेऊन फिरत नाही. येथे टॅलेंट आणि मेहनत महत्त्वाची असते, कागदी पदवी नव्हे. त्यांच्यात आणि प्रियदर्शन यांच्यात शिक्षणाबाबत कधीच चर्चा झाली नव्हती, मग असा उल्लेख का झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरीही त्यांनी जुने संबंध कायम आदराने जपले आहेत.

राजपाल यांनी सांगितले की ते तीन दिग्दर्शकांचे कायम ऋणी राहतील ते म्हणजे राम गोपाल वर्मा, डेविड धवन आणि प्रियदर्शन. या तिघांसोबत त्यांनी सुमारे ४०-५० चित्रपटांमध्ये काम केले असून अनेकदा मानधनाची चर्चा न करता विश्वासावर चित्रपट केले.

आर्थिक अडचणीच्या काळात मोठ्या दिग्दर्शकांनी मदत का केली नाही, या प्रश्नावर त्यांनी हा पूर्णपणे वैयक्तिक विषय असल्याचे सांगितले. हे प्रकरण त्यांच्या मूळ गावी, शाहजहांपुर येथे सुरू असून ते लवकर सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजपाल यांनी आपल्या वडिलांची आठवण काढत भावनिक वक्तव्य केले. त्यांचे वडील शेतकरी होते आणि प्रामाणिकपणाला सर्वांत मोठे मूल्य मानत.“परीक्षेत पात्र नसशील तर नापास हो, गरज पडली तर शेती कर,”असे त्यांनी मुलाला सांगितले होते. स्वतःला आजही ते शेतकऱ्याचा मुलगा मानतात, ज्याने मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात स्थान मिळवले. जेलमधील काळ त्यांनी आयुष्यातील मोठी शिकवण म्हणून स्वीकारला असून, आयुष्य हेच सर्वांत मोठे शिक्षक असल्याचे ते म्हणाले.

वर्कफ्रंटबाबत बोलायच झाल्यास, राजपाल यादव लवकरच प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये अक्षय कुमार आणि दिशा पाटनी यांच्यासोबत, तर ‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्यासोबत ते झळकणार आहेत. राजपाल यादव यांनी या सर्व घडामोडींनंतरही आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवत,“टॅलेंटच खरी ओळख ठरते,”असा ठाम संदेश दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

या वीकेंडला ओटीटीवर बहरणार मनोरंजनाचे रंग, पाहा या सिरीज आणि चित्रपट

हे देखील वाचा