Friday, April 19, 2024

बिग बींची यांची मिमिक्री करून उमटवला अभिनयाचा ठसा, ‘असा’ आहे कॉमेडियन श्रीवास्तव यांचा जीवनप्रवास

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastv) हे सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उचपार घेत असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते. जिममध्ये वर्कआउट करताना अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. हाती आलेल्या माहितीनुसार अनेक दिवसापासून व्हेंटीलेटरवर असलेल्या राजू यांनी बुधवारी (21 सप्टेंबर) रोजा अखेर त्यांचा जीव सोडला आहे. मनोरंजन जगतातून सगळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास…

राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमेशचंद्र श्रीवास्तव होते, ते स्वतः कवी होते आणि बलई काका म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांकडूनच अभिनयाचे बाळकडू घेतलेल्या राजू श्रीवास्तव यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते लहानपणापासूनच उत्तम मिमिक्री करायचे. राजू श्रीवास्तव यांनी अमिताभ बच्चन यांची उत्तम मिमिक्री करून टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला.

Raju-Srivastava
Photo Courtesy: Instagram/rajusrivastavaofficial

आपल्या कारकिर्दिच्या सुरूवातीला छोटे मोठे स्टेज शो करत लोकांचे मनोरंजन केले. त्यानंतर त्यांनी हिंदी सिने जगतात आपली विशेष ओळख निर्माण केली. त्यांनी बॉलिवूडमध्ये तेजाब, मैंने प्यार किया, बाजीगर, मिस्टर आझाद, अभय, बिग ब्रदर, बॉंम्बे टू गोवा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याचबरोबर त्यांनी टेलिव्हिजन जगतात द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, शक्तिमान, राजू हाजीर हो, कॉमेडी सर्कस, कॉमेडी का महामुकाबला, नच बलिए, कॉमेडी नाईट्स विथ कपिल, अदालत, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांमधूनही तुफान लोकप्रियता मिळवली. कूटूंब – राजू श्रीवास्तव यांनी १ जुलै १९९३ मध्ये शिखासोबत लग्न केले. त्यांना अंतरा आणि आयुशमान अशी दोन मुले आहेत.

हेही वाचा – बिग ब्रेकिंग! एका युगाचा अंत, मृत्यूशी झुंज संपली, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

राजू श्रीवास्तव यांचे कार कलेक्शन कमी आहे. त्याच्याकडे इनोव्हा कार आहे. कॉमेडी हा राजू श्रीवास्तव यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत आहे. स्टेज शो, टीव्ही शो व्यतिरिक्त त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. राजू जगातील अनेक कॉमेडी शो, पुरस्कार होस्ट आणि जाहिरातींद्वारे दरवर्षी भरपूर कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो कॉमेडी शो आणि चित्रपटांतून लाखो रुपये कमावतो. राजू श्रीवास्तव यांनी ऑडिओ कॅसेट्स आणि व्हिडीओ सीडीजची रेंजही लाँच केली आहे.राजू श्रीवास्तव यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव 15 ते 20 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’
बिग ब्रेकिंग! एका युगाचा अंत, मृत्यूशी झुंज संपली, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन
खऱ्या आयुष्यातही गुलशन ग्रोवर यांना बायका मानायच्या व्हिलन, हवाई सुंदरीने दिलेला शेजारी बसण्यास नकार

 

 

हे देखील वाचा