बॉलिवूड जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अगदी अल्पावधीत आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे. त्यांच्या या अभिनयामुळे आणि दमदार लूकमुळेच हे नवोदित कलाकार असंख्य चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनत असतात. यामध्ये प्रामुख्याने राजकुमार रावचे (Rajkumar Rao) नाव घेतले जाते. आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपट जगतात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्याची एक सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे ज्याला त्याने राजांमध्ये राजकुमार असा लक्षवेधक कॅप्शन दिला आहे. काय आहे ही बातमी चला जाणून घेऊ.
राजकुमार राव हा बॉलिवूड जगतातील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने चित्रपट जगतात आपली योग्यता सिद्ध केली आहे. त्याच्या अभिनयाचे आणि दमदार भूमिकांचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात. चित्रपटांप्रमाणेच तो सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. आपल्या अकाउंटवरुन तो अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये अभिनेता राजकुमार रावचा थाट पाहायला मिळत आहे.
हा फोटो राजकुमार रावने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये राजकुमार राव एका मोठ्या शाही खोलीत उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये भिंतीवर अनेक राजे आणि राजकुमारांचे फोटो लावलेले दिसत आहेत. नावाने राजकुमार असलेल्या राजकुमार रावचा हा राजेशाही थाट सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या पोस्टला राजकुमारने ‘राजांच्या मधे राजकुमार’ असा दमदार कॅप्शन दिला आहे. या व्हायरल पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. राजकुमार रावने ‘बधाई दो’, ‘शादी मे जरुर आना’, ‘स्त्री’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजकुमार रावच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे झाले तर त्याने अलिकडेच बालमैत्रिण पत्रलेखाशी विवाह केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा