Thursday, September 24, 2026
Home बॉलीवूड हा कसला ड्रेस घातलाय? सोन्याच्या मोहरा लावल्या आहेत का? उर्वशी रौतेलाचा नवीन लूक आला चर्चेत

हा कसला ड्रेस घातलाय? सोन्याच्या मोहरा लावल्या आहेत का? उर्वशी रौतेलाचा नवीन लूक आला चर्चेत

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिचा स्टाईल आणि लूक्सने सगळ्यांना घायाळ करत असते. तिच्या चाहत्यांना इम्पेस करण्याची एकही संधी ती गमावत नाही. अशातच तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. तिचे चाहते तिच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत.

उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की तिने गोल्डन कलरचा एक ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर खूप टिकल्या लावलेल्या दिसत आहेत. तिने लॉन्ग कर्ली हेअर्स केले आहेत. तसेच तिने पायात गोल्डन कलरचे हाय बूट्स घातले आहेत. ज्यात तिचा लूक अगदी किलर दिसत आहे. तसेच चॉकलेट कलरची लिपस्टिक लावली आहे.

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माफ करा मी तुम्हाला माझ्या केसांच्या व्हॉल्यूममुळे ऐकू शकत नाही. चित्रपटावरील जीवन,तुम्हाला माझे केस आवडतात का?” तिच्या या फोटोवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. अनेकांना तिचा हा स्टाईलिश लूक खूप आवडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या तिच्या या अनोख्या ड्रेसचे कौतुक चालले आहे.

उर्वशी लवकरच तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. ती ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही स्टोरी सुपरकॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या खऱ्या कहाणीवर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये ती रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. तसेच ती उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले २’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा