Wednesday, July 3, 2024

Bigg Boss OTT: शमिता शेट्टीला पसंत करू लागलीये राकेश बापटची फॅमिली; बहिणीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन सुरू आहे. या सीझनची थीम ‘स्टे कनेक्टेड’ अशी आहे. शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये एका टास्क अंतर्गत कनेक्शन केले गेले. त्यानंतर केवळ महिला स्पर्धकांनाच हे कनेक्शन जोडण्याचा अधिकार मिळाला. शोच्या १३ स्पर्धकांपैकी ६ कनेक्शन करण्यात आले. एक स्पर्धक दिव्या अग्रवाल एकटी राहिली. नंतर जीशान खानने उर्फी जावेदशी संबंध तोडले आणि दिव्याबरोबर कनेक्ट झाला. घरातील सर्वात लोकप्रिय कनेक्शन म्हणजे राकेश बापट-शमिता शेट्टी आणि मुस्कान जट्टाना-निशांत भट्ट आहेत.

राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यात शोमध्ये चांगलाच लव्ह ऍंगल चालू आहे. घरातील इतर स्पर्धकही दोघांचे पती-पत्नी आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून वर्णन करतात. गेल्या दोन आठवड्यांत प्रेक्षकांनी असेही पाहिले की, राकेश शमितासोबत अनेकवेळा फ्लर्ट करत होता. गेल्या आठवड्यात राकेशने शमिताला अनेकवेळा किस देखील केले. आधीच्या एपिसोडमध्ये, नॉमिनेशन टास्कमध्ये, शमिताने राकेशसाठी तिच्या कुटुंबातील सदस्यांचे पत्र फाडले होते. एपिसोडसह राकेश आणि शमिताची जवळीक वाढतच चालली आहे.

राकेश बापट-शमिता शेट्टी यांच्या वाढत्या जवळीकतेवर राकेशची बहीण शीतल बापटने प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, प्रेक्षकांप्रमाणे तिलाही राकेश-शमिताच्या नात्यात प्रेमाची झलक दिसत आहे. दोघांना एकत्र पाहून छान तिला वाटते. ती म्हणाली, “मला वाटते की हे प्रेम आहे. दोघेही एकमेकांच्या फिलिंग शेअर करत आहेत. या भावनेचा समन्वय चांगला दिसत आहे. आम्ही सर्व कुटुंबात एकमेकांच्या खूप जवळ आहोत, परंतु जेव्हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही काहीही बोलत नाही.”

शीतल पुढे म्हणाली, “जेव्हा राकेशने शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबातील सदस्य थोडे घाबरले होते. कारण राकेश त्याच्या स्वभावाने सौम्य आणि शांतताप्रिय आहे. तिने असेही सांगितले की, त्याने यापूर्वी कधीही ‘बिग बॉस’ पाहिला नव्हता. फक्त ऐकले की, या स्पर्धेत आलेले स्पर्धक आपापसात खूप भांडतात आणि एकमेकांवर चुकीचे आरोप करतात. अशा पस्थितीत राकेश बिग बॉसच्या घरात कसा राहू शकेल? असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला होता. पण त्याची नवीन बाजू पसंत केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सिडनाझ’च्या नात्याबद्दल सिद्धार्थचा मित्र अबू मलिकने केला मोठा खुलासा, म्हणाला…

-पहाटेच्या ३ वाजता सिद्धार्थ शुक्ला झाला होता अस्वस्थ; आईला मागितले पाणी आणि म्हणाला…
-‘मी माझा मुलगा गमावला आहे’, सिद्धार्थच्या निधनावर प्रत्युषाच्या वडिलांनाही भावना अनावर

हे देखील वाचा