Friday, March 29, 2024

राखीने आदिलवर लावला अजून एक गंभीर आरोप; म्हणाली, ‘मी नमाज वाचत असताना मला लाथेने…’

टीव्ही स्टार राखी सावंत हिच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून काहीनाकाही अडचणी सुरु आहेत. महिनाभरापूर्वी राखी सावंतने तिच्या लग्नाची माहिती साेशल मीडियाद्वारे दिली होती. 21 दिवसांपूर्वी आदिल दुर्राणीने स्वतः त्याच्या आणि राखीच्या लग्नाला होकार दिला होता, पण आता राखीने जाहीर केले आहे की आदिल तिला सोडून दुसऱ्या मुलीकडे गेला आहे. त्याशिवाय राखीने आदिलवर नको ते आरोपही केले आहेत.

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्धी झोतात असलेली अभिनेत्रा राखी सांवत (Rakhi Sawant) सध्या सतत आपल्या वैक्तीक आयुष्यामुळे लोकांचे लक्ष वेधत आहे. तिच्या संसारामध्ये मोठं वादळ आलं आहे. राखीने मीडियासमोर तिचा पती आदिल दुर्रानी (Adil Durrani) वर नको ते आरोप केले आहेत अशातच राखीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखीन आदिलची त्याच्या घरामधी कशी वागणूक दिली आहे यावर भाष्य केलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखीने एका भयंकर प्रसंगाबाबत सांगितलं आहे ती म्हणाली की, “आदिलने मला लाथेने मारलं आहे. मी एक दिवस नमाज वाचत होते, तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला होता आणि त्याने मला नमाज वाचत असताणाच लथेने मारलं होतं. या आरोपांशिवाय तिने पैसै आणि दागिने घेऊन पळून गेल्याचाही गंभीर आरोप तिच्या पतीवर केला आहे.

 

View this post on Instagram

 

काही दिवसांपूर्वीच राखी आई जया सावंत यांचं निधन झालं तेव्हा राखीने त्यांच्या निधनाचा जबाबदारही आदिललाच ठरवलं होतं. “माझी आई आदिल खानमुळे गेली. आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत. तिच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती.” असं म्हणत राखीने हंबरडा फोडला होता.

काही दिवसांपूर्वी आदिलेनेही राखीच्या आरोपांवर मौन सोडले होते. त्याच्या मते ‘तो शांत माणुस आहे तो स्त्रियांचा आदर करतो म्हणून राखीचा चेहरा जगासमोर आणत नाही म्हणून तो चुकीचा आहे असं समजू नका असं म्हणत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले होते. त्याशिवाय राखीने श्रद्धा वालकर हत्याकांडचा सदर्भ देत आदिलवर निशाना साधला होता मात्र, आदिलनेही सुशांत सिंग राजपुतचं उदाहरण देत राखील सडेतोड उत्तर दिल होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकावं ते नवल! कोलकात्यात चाहत्यांनी बनवलंय ‘बच्चन धाम’ मंदिर, दररोज होते बिग बींची पूजा
निमृत कौर फिनालेच्या काही दिवस आधी बिग बॉसमधून बाहेर, मंडळींमधील अजून एक सदस्य कमी

हे देखील वाचा