एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यापासूनच चर्चेत आहे. यापूर्वी ती कॅमेऱ्यासमोर एकटी दिसायची. पण आता तिचा नवराही तिच्यासोबत दिसत आहे. अलीकडेच, अभिनेत्री उघडपणे तिच्या पतीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली. मात्र, यादरम्यान रितेश लाजताना दिसला. आता त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ‘आयटम गर्ल’ राखी सावंतचा ‘बिग बॉस १५’ चा प्रवास नुकताच संपला आहे. मात्र, घरातून बाहेर पडताच ड्रामा क्वीनला तिचा नवरा रितेश परत मिळाला आहे. त्याचवेळी, अभिनेत्री रस्त्यावरच तिच्या पतीकडे किसची मागणी करताना दिसली आहे.
मीडियासमोर मागितली किस
राखी सावंत ‘बिग बॉस’च्या घरातून पती रितेशसोबत आऊटिंगला निघाली होती. यादरम्यान सर्व पॅपराजींनी त्यांना घेरले आणि दोघांनाही एकत्र पाहून शुभेच्छा देऊ लागले. मीडियाला पाहताच राखी सावंत पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये आली आणि तिने रितेशकडे किसची मागणी करायला सुरुवात केली. किस मागताना राखी म्हणाली, “अरे दे तरी… मी तुझी बायको आहे, शेजाऱ्याची नाही.”
हा व्हिडिओ पाहून एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “दीपक कलाल हा व्हिडिओ पाहून कोपऱ्यात रडला असेल.” दुसर्याने लिहिले, “बस कर यार, आता खूप ऍक्टिग झाली.” त्याचवेळी दुसरा म्हणतो की, “दोघेही प्रसिद्धीसाठी काहीही करत आहेत.”
व्हिडिओ झाला व्हायरल
मात्र, राखीचे हे वागणे पाहून पती रितेश लाजून लालबुंद झालेला दिसला. पण राखीने हार न मानता रितेशची किस घेतली. या जोडप्याचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यासोबतच चाहते एकापेक्षा एक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. क्लिपमध्ये, अभिनेत्रीने केशरी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केलेला दिसत आहे, तर रितेश पांढर्या आणि काळ्या पोशाखात दिसत आहे.
हेही वाचा-
- ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकले राम चरण-कीर्ती सुरेश; व्हिडिओ पाहून तुम्हीही धराल ठेका
- ‘पंजाबच्या कॅटरिना’ला भावाकडून वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा! व्हिडिओ शेअर करत म्हणाल, ‘तुला माझं आयुष्य…’
- Video: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्यालाही चढला ‘पुष्पा’चा फिव्हर, आजीसोबत लावले ठुमके