Friday, March 29, 2024

मोठमोठ्या कलाकारांना बाजूला सारत राखी सावंतच्या बोल्ड लूकने वेधले सर्वांचे लक्ष

मनोरंजनविश्वातील ड्रामाक्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत सतत तिच्या वेगवेगळ्या विचित्र हरकतींमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते. प्रसिद्धी मिळवण्याची एकही संधी ती अजिबात वाया जाऊ देत नाही. आता पुन्हा एकदा राखी तिच्या एका बोल्ड ड्रेसमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान राखीने तिच्या ड्रेसने आणि ग्लॅमरस अवताराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अनेक कलाकार या कार्यक्रमात येऊनही सर्वांचे लक्ष फक्त राखीवरच केंद्रित होते.

य कार्यक्रमातील राखीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. लाल रंगाचा फ्रंट आणि साइड कट सेक्विन ड्रेस घातलेल्या राखीने पापाराजीना बघत अनेक बोल्ड पोज दिल्या. मीडियाचे कॅमेरे पाहून राखी विचित्र हरकती देखील करताना दिसली. राखीने या ड्रेसेसवर केस मोकळे सोडलेले दिसत असून, तिच्या या ड्रेसमधून ती तिचे क्लिविजेस फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या या लूकमुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, सगळीकडे तिच्या या लूकची चर्चा होताना दिसत आहे.

राखीने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केले होते यात ती व्यक्तीसोबत दिसत आहे. या रिलच्या बॅकग्राऊंडला एक रोमँटिक संवाद ऐकायला मिळत असून, ते दोघेही एकमेकांना ह्ग करताना दिसत आहे. त्यांच्यातली बॉंडिंग सर्वानाच हैराण करत आहे. हे रील पाहून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केले गेले त्यानंतर तिने हे रील डिलीट केले. तत्पूर्वी बिग बॉसच्या घरात राखी सावंतने पहिल्यांदा तिच्या नवऱ्याला रितेशला जगासमोर आणले होते. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर काही दिवसातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा