Saturday, June 29, 2024

फॅन असावी तर अशी! लहानग्या चाहतीकडून राखी सावंतला १.५ लाख रुपयांचं गिफ्ट; अभिनेत्रीही झाली भलतीच खुश

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत टिकून राहिली आहे. शोमध्ये राखीने स्वतःच्या अभिनयाच्या कलेने सगळ्यांचे हृदय जिंकून घेतले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील खूप आहे. नुकताच तिच्या एका लहानग्या चाहतीने तिला दिलेल्या गिफ्टमुळे ती खूपच चर्चेत आहे. हे गिफ्ट पाहून राखीच्या भलतीच खुश झाली

राखीच्या या चाहतीने तिला दीड लाख रुपयांचा फोन भेट केला आहे. याची माहिती सांगत राखीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहतीसोबत दिसत आहे. तिने राखीला सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 2 हा फोन दिला आहे. या फोनची किंमत 1,49,998 रुपये एवढी आहे. राखी ज्यावेळी या फोनची पॅकिंग उघडत होती, त्यावेळी ती खूपच खुश दिसत येत होती.

राखी सावंत व्हिडिओमध्ये सांगत आहे की, “हाय मित्रांनो, ही मी आहे, ही माझी चाहती आहे पारूल आणि हिने माझ्यासाठी काय आणले आहे, एक अनपेक्षीत भेटवस्तू.” फोन पाहिल्यानंतर राखी म्हणते की, “कोणी एवढा मोठा चाहता कसा असू शकतो?” राखीने पॅकिंग उघडल्यानंतर तिच्या तरुण चाहतीला किस सुद्धा केला आणि बिग बॉसच्या इतर स्पर्धकांना तिच्यावर जळू नका असे सांगितले.

बिग बॉस 14 मध्ये सलमान खानसोबत राखीच्या ट्यूनिंगला दर्शकांनी खूप प्रतिसाद दिला होता. राखीने चांगल्या पद्धतीने सर्वांचे मनोरंजन केले होते, ज्या कारणाने ती खूप चर्चांमध्ये टिकून राहिली होती. आत्ताच्या काही दिवसातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.

काही दिवसांपूर्वी जेव्हा राखी वर्कआऊटला निघाली होती, तेव्हा पॅपराजींनी घेरलं होत. अभिनेत्रीने शांततेत फोटोग्राफरच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. फोटोग्राफर्सने राखी सावंतला बॉलिवूडमध्ये वाढत्या कोरोनाबद्दल विचारणा केली. यावर राखीने सांगितले की, कोणत्या कारणाने बॉलिवूडमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

-याला म्हणतात कहर! भोजपुरी स्टार अंकुश आणि शिल्पी यांच्या गाण्याचा राडा, दोन महिन्यातच मिळालेे १८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

-अनुपम खेर यांनी केला रस्त्यावर गाणाऱ्या मुलांचा सुंदर व्हिडिओ शेअर, म्हणाले ‘मला त्यांंना जग…’

हे देखील वाचा