Monday, July 8, 2024

‘ड्रामा क्वीन’ बनली ‘गंगुबाई’, राखीचा स्वॅग पाहून चाहतेही म्हणाले, ‘आलिया भट्टपेक्षाही भारी’

प्रसिद्धी पिपासू जीव राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. कधी बोल्ड  फोटोमुळे, तर कधी विवादित वक्तव्यामुळे ती नेहमीच सगळयांचे लक्ष वेधून घेत असते. काही दिवसांपूर्वी ती ‘बिग बॉस १५’ मध्ये झळकली होती. यामध्ये तिने चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र, नेहमी ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमाचे कौतुक करणारी राखी सावंत तिला  कार्यक्रमातून बाहेर काढल्यानंंतर जोरदार संताप व्यक्त केला होता. आता पून्हा एकदा तिने आलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडी  या  चित्रपटाच्या दमदार प्रमोशनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.  काय आहे राखीचा हा नवा ड्रामा चला जाणून घेऊ.  

ड्रामा क्वीन राखी सावंतने (Rakhi Sawant) आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी‘ चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा जणू विडाच उचलला आहे. राखी सावंत सध्या या चित्रपटाचे सगळीकडे प्रमोशन करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शनानंतरही राखीने सिनेमागृहात जाऊन तिकीट खरेदी केले होते. त्यावेळी तिने आलिया भट्टच्या दमदार अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले होते.

आता राखीने चित्रपटातील आलिया भट्टच्या लूकमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने चित्रपटातील ‘ढोलिदा’ गाण्यावर डान्सही केला आहे. सध्या राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

राखी सावंतने  गंगुबाईचा लूक दाखवताना कपाळावर मोठी टिकली, मेकअप, केसांचा बुचडा आणि त्यामध्ये गुलाब, गळ्यात भारदस्त दागिने, असा दमदार पोशाख परीधान केला आहे. त्याचबरोबर ती चित्रपटातील ‘ढोलिदा’ गाण्यावर थिकरताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यामध्ये अनेकांनी ‘आलिया भट्टपेक्षा तूच भारी करतेस’ असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. तत्पूर्वी, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. सोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आहे. चित्रपटात आलिया भट्टसोबत अजय देवगणही प्रमुख भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही  वाचा-

हे देखील वाचा