Wednesday, March 19, 2025
Home बॉलीवूड कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत आता मारणार तुमच्या ‘ड्रीम मध्ये एंट्री’; नवीन आयटम नंबरचा यूट्यूबवर धुराळा

कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत आता मारणार तुमच्या ‘ड्रीम मध्ये एंट्री’; नवीन आयटम नंबरचा यूट्यूबवर धुराळा

टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीची कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून राखी सावंत ओळखली जाते. राखी सावंत हे नाव माहित नसेल असे कोणी शोधूनही सापडणार नाही. या ना त्या कारणामुळे ती सतत चर्चेत राहते. सोशल मीडियावर तर दररोज तिचे व्हिडिओ वेगवगेळे व्हायरल होत असतात. अगदी वैयक्तिक यशापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वच गोष्टी राखी दिलखुलासपणे सर्वांसोबत शेअर करत असते. आपल्या बेताल व्यक्तव्यांमुळे नेहमी लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या राखी सावंतच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

नुकतेच राखी सावंतचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘ड्रीम में एंट्री’ असे तिच्या या गाण्याचे नाव असून, या गाण्याच्या निमित्ताने राखी बऱ्याच दिवसांनी आपल्याला डान्स करताना दिसणार आहे. या गाण्यात राखीने तिच्या मादक अदा आणि मूव्हज दाखवले असून, गाणे बघताना ९० च्या दशकातील एखादे गाणे बघत असल्याचा भास आपल्याला होईल. सारेगामा इंडियाने हे गाणे प्रदर्शित केले असून, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका शबीना खान यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.

या गाण्याबद्दल सांगताना राखी म्हणाली, “हे एक धमाकेदार गाणे आहे. मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणे ऐकले, तेव्हा गाणे ऐकतानाच माझे पाय थिरकायला लागले होते. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन शबीना खान करते हे समजल्यावर तर मला विश्वासच बसला की, हे गाणे हिट होणारच. मागच्या अनेक दिवसांपासून मी आणि माझे फॅन या गाण्याच्या प्रदर्शनाची वाट बघत होतो. अखेर आज हे गाणे प्रदर्शित झाले आहे. अनेक वर्षांनी माझे डान्स असलेले मोठे गाणे प्रदर्शित झाले आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर गाण्याला मिळणार प्रतिसाद आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मला खूप आनंद होत आहे. ” (rakhi sawant new song dream mein entry release)

या गाण्याला कोरिओग्राफ करणाऱ्या शबीना खान यांनी सांगितले की, “मी पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओसाठी कोरिओग्राफी करत आहे. हे गाणे चित्रित करण्यासाठी आमच्याकडे खूपच कमी वेळ होता. मात्र आमच्याकडे राखी सावंत असल्याने आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. तिच्या असण्यामुळे माझे काम खूप सहज झाले. हे गाणे खूपच मस्त आणि आकर्षित आहे. हे गाणे जबरदस्त हिट होणार यात शंकाच नाही.”

काही दिवसांपूर्वी जेव्हा राखीने कोरोना लसीचा डोस घेतला, तेव्हा ती हेच गाणे गाताना दिसली. मागील काही दिवसांपासून ती या गाण्याचे प्रमोशन करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या

हे देखील वाचा