Sunday, March 29, 2026
Home कॅलेंडर राखीचा तर्क ऐकूण एमबीबीएस वारलं.! डॉ. राखी सावंत म्हणते की, बटाटा खाल्ल्यावर हृदयातील ब्लॉकेज क्लिअर होतात, कसं? पाहा व्हिडिओ

राखीचा तर्क ऐकूण एमबीबीएस वारलं.! डॉ. राखी सावंत म्हणते की, बटाटा खाल्ल्यावर हृदयातील ब्लॉकेज क्लिअर होतात, कसं? पाहा व्हिडिओ

सिनेक्षेत्र म्हणजेच मनोरंजनाची हक्काची जागा. त्यातही टीव्ही क्षेत्राचा एक मोठा चाहता वर्ग आहे. टीव्ही चॅनेलवर असलेल्या मालिकांबाबतीत लोकांचं एक वेगळंच जग आहे. तिथे असणारा प्रेक्षकवर्ग यांच्यासाठी फक्त मनोरंजनच नाही, तर काहीतरी नवीन शिकण्याचे अनुभवण्याचे व्यासपीठ म्हणजे देखील टीव्ही मालिका अथवा तेथील कार्यक्रम असतात.

भारतात बिग बॉस या रिअ‌ॅलिटी शो चा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यातही तिथे घडणारे विविध किस्से यामुळे हा शो अधिकच लोकप्रिय होत आहे. बिग बॉसच्या घरात दरदिवशी कधी भांडण तर कधी मनोरंजन पाहायला मिळतं.

Rakhi sawant
Rakhi sawant

मात्र, सध्या सर्वांचच आकर्षण ठरतेय ती म्हणजे राखी सावंत. कधी ज्युली बनून तर कधी आपल्या मजेदार स्वभावाने ती सर्वांचेच मनोरंजन करते. सध्या मात्र ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. राखीचा सध्या एक व्हिडिओ सध्या सोशल साईटवर जबरदस्त वायरल होतोय.

या व्हिडिओत राखी राहुल वैद्यला बटाटा खाल्ल्याने हृदयातील ब्लॉकेज निघून जातात, कमी होतात असे सांगताना दिसत आहे.

खरे तर नेहमी असे म्हटले जाते की, राखी सावंत कधी काय बोलेल याचा नेम नाही. तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण आता असंच म्हणाल. राखीने या व्हिडिओत दिलेला सल्ला पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

राखी सावंत या व्हिडिओत राहुल वैद्यशी चर्चा करताना दिसत आहे. त्यात तिने बटाटा खाल्ल्याने पोटातील किडे मरतात आणि त्यामुळे हृदयाचे ब्लॉकेज उघडतात असे सांगितले आहे.

तसेच, बटाटा खाल्ला की गॅस होतो. तो गॅस वर येऊन हृदयापर्यंत पोहोचतो, मग तिथे थोडं दुखायला लागत आणि त्याने हृदयातले ब्लॉकेज उघडायला मदत होते. जेव्हा तोंडातून ढेकर देतो म्हणजे हृदयाचे ब्लॉकेज उघडतात, असा सल्ला दिला. तिच्या या अजब शोधाने सगळेच अवाक होतात.

खरा आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे, ती पुढे राहुलला सांगतेय की तिने कॅनडातून एमबीबीएस केले आहे. मात्र, राहुल जेव्हा तिला एमबीबीएसचा फुलफॉर्म विचारतो, तेव्हा मात्र ती बुचकळ्यात पडते. यावर ती राहुलला मेडीकल मेडीसीन बॅचलर ऑफ सायन्स असे भन्नाट उत्तर देते.

हे देखील वाचा