राखी सावंतवर बनणार बायोपिक? म्हणतेय, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी माझी भूमिका

rakhi sawant says javed akhtar wants to write her biopic she feels alia bhatt should play her role


‘बिग बॉस 14’ या रियॅलिटी शोमध्ये दिसणारी अभिनेत्री राखी सावंत बराच काळ चर्चेत होती. शोमध्ये तिने तिच्या मजेदार अंदाजाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी राखी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

वृत्तानुसार, गीतकार जावेद अख्तरला तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आहे, असा दावा राखी करत आहे. तिने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “एक वर्षापूर्वी मला जावेद अख्तरजींचा फोन आला. माझ्यावर बायोपिक लिहायची आहे असे ते मला म्हणाले. त्यांनी मला भेटायलाही बोलावले होते. पण मी त्यांना भेटू शकले नाही. त्यांना माझी बायोपिक बनवायची आहे. पण प्रेक्षकांना ते पाहायला आवडेल की नाही हे मला माहिती नाही.”

आलियाने साकारावी भूमिका
वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात जेव्हा राखीला तिच्या भूमिकेत कोण फिट असेल असे विचारले, तेव्हा तिने आलिया भट्टचे नाव घेतले. राखी म्हणाली, “मला माहित नाही की ते माझ्या भूमिकेसाठी मला, आलिया किंवा प्रियांका चोप्रामधील कोणाला कास्ट करतील? पण मला स्वत: वर खूप प्रेम आहे. जर मी ही भूमिका नाही केली, तर आलिया किंवा दीपिका पदुकोणने करायला पाहिजे. याव्यतिरिक्त करीना कपूर खान सारख्या कोणीही भूमिका केली तरी मला चालेल. कारण या सगळया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहेत आणि माझ्या आवडत्या आहेत.”

फरहान अख्तर तिच्या बायोपिकचे दिग्दर्शन करू शकतो, असेही राखी म्हणाली.

जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया
याबाबत जेव्हा जावेद अख्तर यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी राखीशी भेटल्याचे कबूल केले. जावेद यांनी हेही कबूल केले की, त्यांनी राखीला तिच्या आयुष्यावर स्क्रिप्ट लिहिणार असल्याचे सांगितले होते. अख्तर यांच्या म्हणण्यानुसार, राखीशी त्यांची भेट जवळपास 4-5 वर्षांपूर्वी एका फ्लाईटमध्ये झाली होती. तिथे राखीने त्यांना तिच्या बालपणाबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी राखीच्या आयुष्यावर स्क्रिप्ट लिहिण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आजारी आईच्या सेवेत व्यस्त आहे राखी
‘बिग बॉस 14’ ची स्पर्धक असणारी राखी सावंत आजकाल कर्करोगाशी झुंज देणारी आई जया सावंत यांच्या सेवेत व्यस्त आहे. जया यांची केमोथेरपी मुंबईतील रूग्णालयात सुरू आहे. या कठीण काळात सलमान खान, सोहेल खान, बॉबी देओल, कविता कौशिक, विंदू दारा सिंग, कश्मीरा शाह आणि संभावना सेठ यांसारख्या अनेक सेलिब्रिटी राखीसोबत उभ्या राहिल्या आहेत.

राखीने अलीकडेच सांगितले की, तिच्या आईवर उपचार करणारी डॉक्टर ही सलमान खानच्या ओळखींपैकी एक आहे. तिने रुग्णालयातून आईचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले होते की, “कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर कॅन्सरसाठी उपचार सुरू आहेत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आमिर खान आहे खऱ्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण; ‘लगान’मधील मित्राची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

-‘द डर्टी पिक्चर’मधील भूमिकेमुळे प्रचंड घाबरली होती ‘विद्या बालन’, स्क्रीनिंगनंतर घडलेले न विसरण्यासारखे

-तब्बल ३० वर्षांनंतर अनुपम खेर यांचे टॉलिवूडमध्ये कमबॅक, बुमराहच्या कथित गर्लफ्रेंडसोबत करणार ‘या’ सिनेमात काम


Leave A Reply

Your email address will not be published.