Saturday, July 6, 2024

कट्टर वैरी असणारी शर्लिन चोपडाचे गुणगाण गातेय राखी सावंत; म्हणाली, ‘तिने मला खूप सपोर्ट…’

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या तिचा पती आदिल दुर्रानी यांच्या वादामुळे खूपच चर्तेच आहे. गेल्या काही दिवसातच राखीच्या आयुष्यामध्ये संकटाचे डोंगर केसळले आहेत आदी आईचे निधन आणि नंतर पतीचा दगा यामुळे राखी खूपच त्रस्त आहे. आदिलच्या वादापूर्वीही राखी अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या वादामुळे खूपच चर्चेत होती.या दोघींचा वाद एवढा पेटला होता की, त्यामुळे राखीला पोलिस चौकीच्या हेल्पाट्या माराव्या लागला होत्या. मात्र, आता तिच राखी शर्लिनचे गुणगाण गात आहे.

‘ड्रामा क्वीन’ प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant ) सतत मीडियासमोर तिचा पती आदिल दुर्रानी (Adil Durrani)वर आरोप लावताना पाहायला मिळाली. एवढ्यासगळ्या ड्राम्यामध्येच तिच्यासोबत काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे राखीने चक्क तिची वैरी शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) बदद्दल कौतुक केलं आहे. राखी मीडियासोबत बोलताना म्हणाली की, “धन्यवाद शर्लिन. काल मी आणि राजश्री शर्लिनला भेटलो. तिने माझी समजूत काढली. तिलाही माझ्याबद्दल समजल्यावर दु:ख झालं अशा परिस्थितीतही तिने मला खूप हिम्मत दिली, साथ दिला पाठिंबा दिला. मी नेहमीच म्हणायचे की, आय लव्ह आदिल. पण आता नाही, आय लव्ह माय सेल्फ. मला जगायचं आहे. मला चांगलं काम करायचं आहे.”

 

View this post on Instagram

 

शर्लिन चोपडा आणि राखी सावंत वाद
राखी आणि शर्लिनचा वाद काही दिवसांपूर्वीच पेटला असून सोशल मीडियावर ट्रेडिंग विषय बनला होता. शर्लिन सतत साजिद खान (Sajid Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यावर निशाना साधून टीका करत होती कराण तिला साजिदला बिग बॉस 16 च्या बाहेर काढायचे होते. शर्लिनने साजिदवर लैंगिक अत्याराचा आरोप लावला केला होता. त्यामुळे साजिदला सपोर्ट करणाऱ्या सलमानवरही तिने टीका केली होती. मात्र, यामुळे राखीने शर्लिनची शाळा घेतली होती. ज्यामुळे  यादोघींचेच भाडण पेटले. राखीने शर्लिनचा अश्लील व्हिडिओ मीडियामध्ये दाखवण्यामुळे तिला पोलिसांनी बेड्या देखिल ठोकल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘चक दे इंडिया’ची अजून एक अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, व्हायरल फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव
समंथाच्या ‘शाकुंतलम’ची नवीन रिलीज डेट आली समाेर, ‘या’ दिवशी हाेणार चित्रपट प्रदर्शित

हे देखील वाचा