Tuesday, April 16, 2024

आदिल दुर्रानीच्या अटकेनंतर राखी सावंतच्या पूर्व पतीची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तु ज्या वेदनांचा सामना करतेस…’

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद पाहायला मिळत आहेत. ‘त्याशिवया आदिलचे अफेअर आहे, त्याने मला मारहान केली, त्यासोबतच तो तिचे दागिने आणि पैसे घेऊन पळाला’ अशाप्रकारचे अनेक आरोप राखीने आदिलवर केले आहेत ज्यामुळे त्याला अटकही झाली आहे. कोर्टाने आदिलला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. अशताच राखीचा पूर्व पती रितेश राज याने राखीवर कोसळेल्या संकटावर भाष्य केलं आहे.

ड्रामा क्वीन म्हणनू ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या अभिनयापेक्षा जास्त वैयक्तीक आयुष्यामुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. काही दिवसांपूर्वीच राखीची आई जया सावंत (Jaya Sawant) यांचे निधन झाले ज्यानंतर राखीच्या आयुष्यामध्ये संकटाचं वादळच आलं. लग्नाच्या काही दिवसातच राखी आणि पती आदिल दुर्रानी (Adil Durrani) यांच्या नात्यात वादाची टिणगी पेटली आणि हा वाद पोलिस स्टेशनपर्य पोहोचला आहे ज्यामुळे राखी खूपच त्रस्त आहे. अशताच राखीचा पूर्व पती रितेश राज (Ritesh Raj) इंस्टाग्रामवर लाइव्ह आला असून राखी आणि आदिलच्या नात्याबद्दल सांगितलं.

रितेश म्हणाला की, “राखी खूप भारी मुलगी आहे, ती नेहमी खरंच बोलते. राखी जे काही आदिलबद्दल सांगत आहे ते तिने मला तीन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं. राखी मी तुझ्यासोबत आहे आणि सदैव असेन. आज तु ज्या वेदनांचा सामना करत आहेस त्या वेदना मलाही एकेकाळी झाल्या होत्या. माझ्या आई-वडिलानंतर जर कोणी सर्वात जास्त माझ्यावर प्रेम केलं असेल ती व्यक्ती म्हणजे राखी सावंत.”

 

View this post on Instagram

 

रितेश पुढे म्हणाला, “ज्या दिवशी राखीच्या आईचे निधन झाले त्याच दिवशी त्या माझ्या स्वप्नात आल्या आणि त्यांनी मला नेहमी राखीला पाठिंबा दे असं सांगितलं होतं म्हणून राखी मी सदैव तुझ्यासोबत आहे. राखी मी तुझ्यासोबत कधीच वाईट केलं नव्हतं आणि त्रासही दिला नव्हता. त्याशिवाय मी 2 वर्ष तुझ्या आईवर उपचार केलेत. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज पडेल तिथे मी नक्कीच असेल.” त्यासोबतच रितेश म्हणाला की, राखीच्या जिवाला धोका आहे तिला काही झालं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. काळजी घे राखी.”

अशाप्रकारे राखीचा पूर्व पती रितेशने राखीबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.त्याशिवाय राखीला आदिलच्या प्रकरणाध्ये रितेशचा पूर्ण सपोर्टही असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ मल्होत्राच्या दिल्लीतील घरी दणक्यात झाले नववधूचे स्वागत, नवविवाहित जोडप्याने केला दमदार डान्स
देवमाणूस! सोनू सूदच्या चाहत्यांनी केली हद्द पार, चक्क अभिनेत्याचं मंदिर बनवून मुर्तीचे…

 

 

हे देखील वाचा