Wednesday, April 23, 2025
Home बॉलीवूड ‘बिग बॉस’ची नवी खेळी; स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी राखी सावंत पती आदिल खानबरोबर करणार प्रवेश?

‘बिग बॉस’ची नवी खेळी; स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी राखी सावंत पती आदिल खानबरोबर करणार प्रवेश?

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या 17व्या पर्वात ड्रामा क्वीन राखी सावंत पती आदिल खान-दुरानीबरोबर प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, राखी सावंत यांनी स्वतः या चर्चांवर खुलासा केला आहे. अजूनपर्यंत स्पर्धकांचा खेळ प्रेक्षकांना तितकासा खिळवून ठेवणारा वाटत नाहीये. त्यामुळे निर्मात्यांनी आता या पर्वाचा टीआरपी वाढवण्यासाठी शोमध्ये आणखी वाइल्ड कार्ड स्पर्धकांचा प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतचं नाव असल्याचं समोर आलं होतं. पण राखी सावंतने स्वतःच या बातमीचं खंडन केलं आहे.

राखी सावंतने ‘बॉलीवूड बबल’ या एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेशी बातचित करताना बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं. ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणालीकी, “हे सर्व काही खोटं आहे. ही बातमी चुकीची आहे. मी सध्या दुबईत आहे.”

राखी व्यतिरिक्त भाविन भानुशाली आणि पूनम पांडे हे दोघं वाइल्ड कार्ड स्पर्धेक म्हणून शोमध्ये प्रवेश करणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. भाविन भानुशाली हिने बिग बॉसच्या 14 व्या पर्वात सहभाग घेतला होता. तर पूनम पांडे हिने बिग बॉसच्या 12 व्या पर्वात सहभाग घेतला होता. या दोघींच्याही शोमध्ये परत येण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

दरम्यान, अलीकडच्या भागामध्ये बिग बॉसने विकी जैन, अरुण माशेट्टी, सनी आर्या, सना रईस खान आणि अनुराग डोवाल यांना आर्काइव्ह रूममध्ये बोलावले आणि सांगितले की, आज मला तुमच्याकडून परफॉर्मन्स रिव्ह्यू घ्यायचा आहे. यानंतर बिग बॉसने त्यांना तीन स्पर्धकांची नावे सांगण्यास सांगितली, ज्यांना याआधीच शोमधून बाहेर काढायला पाहिजे होते. यावर सर्वांनी जिग्ना व्होरा, रिंकू धवन आणि नावेद सोल यांची नावं सांगितली. त्यामुळे यामधील नावेद आता शोमधून बाहेर झाला आहे.या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री होणार आहे. हे स्पर्धक कोण आहेत, हे येत्या काळात स्पष्ट होईल. (Rakhi Sawant will enter the Bigg Boss house with husband Adil Khan)

आधिक वाचा-
कॉमेडी आणि रोमान्स करून कार्तिक आर्यन झालाय बोर, ‘हा’ रोल निभावण्याची इच्छा केली व्यक्त
बेबो म्हणू की लाल मिरची? करीनाचा सुपरहॉट लूक व्हायरल

 

हे देखील वाचा