Sunday, December 3, 2023

विस्कटलेले केस आणि रस्त्याने बडबडताना दिसली राखी सावंत? अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकरी हदरले

‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सांवत होय. बॉलिवूडच्या प्रसिद्धी पिपासू कलाकारांमध्ये अभिनेत्री राखीच्या नावाचाही समावेश होतो. राखी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशात आता तिचा एक्स पती आदिल दुर्रानी तुरुंगातून बाहेर आला आहे. सध्या ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखी आणि तिचा माजी पती आदिल दुर्रानी एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत. राखी सावंतने नुकताच तिचा पती आदिल खान दुर्रानी विरोधात मानहानीचा दावाही दाखल केला होता. या सगळ्यामध्ये राखी आता एका नव्या लूकमध्ये दिसली.

राखी (Rakhi Sawant) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच व्हायरल होता. राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते नको ते अंदाज लावत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राखी विचित्र आवतारामध्ये दिसत आहे.

राखी सावंत एका पार्लरबाहेर स्पॉट झाली होती. यादरम्यान राखी सावंत लहान केसांमध्ये दिसली. त्यावरून राखी सावंतने माध्यमांशी सवांद साधताना केसांबाबत खुलासा केला आहे. राखी म्हणाली, “मला माझे केस लहान करायचे नव्हते पण तणावामुळे माझे केस गळायला लागल्याने मला ते कट करावे लागले.” तिने तिचे केस कापल्याचा दोष आदिल खानला दिला आहे. तसेच पुढे बोलताना राखी म्हणाली की, ती भावनिकदृष्ट्या तुटलेली आहे आणि ती नैराश्याला समोरे जात आहे. आदिलमुळे तिचे मित्र देखील तिने गमावल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Waahiid Ali Khan (@sshaawntv)

राखी पुढे म्हणते की, “माझ्याकडे वेब सिरीज आणि प्रोजेक्ट्स येत आहेत. पण माझ्या नवीन नुकसानामुळे या सर्व गोष्टींवर परिणाम होईल. आदिलने मला आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्याने माझे सर्व मित्र, पैसे आणि सर्व काही घेतले, मी महागड्या कारमध्ये प्रवास करायचे. पण आता मला ऑटोमध्ये प्रवास करावा लागतो. (Rakhi Sawant new look viral)

अधिक वाचा-
India VS Bharat; अभिताभ बच्चन यांचे ट्विट व्हायरल; म्हणाले, ‘भारत माता की जय…’
काळ्या डिझायनर ड्रेसमध्ये कंगना रणौत; पाहा फोटो

हे देखील वाचा