बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटामुळे फार चर्चेत आहेत. अक्षय या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या संदर्भात तो रियॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर २’ या शोच्या ‘रक्षाबंधन’च्या विशेष भागात आला, पण शो दरम्यान असे काहीतरी घडले की, खिलाडी कुमार आपले अश्रू थांबवू शकला नाही आणि जोराजोरात रडू लागला.
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’चे प्रमोशन करण्यासाठी ‘सुपरस्टार सिंगर २’ येथे पोहोचला होता. या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अक्षय त्याच्या ऑनस्क्रीन बहिणींबरोबर दिसतोय. यावेळी, एका मुलाने ‘फुलो का तारों का सबका कहना हैं’ हे गाणे गायले आणि अक्षय कुमारसाठी त्याची बहीण अलकाचा संदेश वाचला. हा गोंडस संदेश ऐकल्यानंतर अक्षय भावनिक होतो आणि त्याचे अश्रू थांबवू शकत नाही.
View this post on Instagram
प्रोमोमध्ये दिसते की, स्क्रीनवर अक्षय कुमार याच्या बहिणींचा फोटो लावला होता. प्रोमोमध्ये अक्षयची बहीण अलकासोबतचे त्याचे फोटो पडद्यावर झळकत असल्याचे दिसत आहे. यासोबतच अलका म्हणते की, “काल ती ११ ऑगस्टला राखी आहे. तो नेहमीच माझ्यासोबत सुख दुःखात उभा राहला. मित्र, भाऊ, वडील… सगळ्या भूमिका पार पाडल्या. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद राजू.” बहिणीचा मेसेज ऐकून अक्षय कुमार रडायला लागतो आणि नंतर सगळ्यांना त्याच्या जुन्या दिवसांबद्दल सांगतो. अक्षय सांगतो, “आम्ही सगळे एका छोट्या घरात राहायचो. त्या एका देवीच्या आगमनानंतर आमचे जीवनच बदलून गेले. बहिणीच्या नात्यापेक्षा मोठे कोणी नाही.”
अक्षय कुमार याचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट ११ ऑगस्टला सिनेमाघरात येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) दिसणार आहेत. आनंद एल राय यांनी ‘रक्षाबंधन’ या सिनेमाचेही दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा एका भावाची आहे, ज्याला आपल्या लग्नाआधी आपल्या बहिणींचे लग्न करायचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ब्रेकअपच्या बातम्यांमध्येच टायगरच्या व्हिडिओवर दिशाची गजब मागणी; चाहतेही म्हणाले, ‘छोटी बच्ची हो क्या?’
दीपिकाचा बर्थडे : लग्नासाठी धर्म बदलल्याने कायम चर्चेत राहिलेली अभिनेत्री, बघा तिचे मुस्लीम नाव
‘तुझी चड्डी नाही उतरवली, तर आदित्य नाव नाही सांगणार’, वादाशी घट्ट नातं असणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक