ब्रेकअपच्या बातम्यांमध्येच टायगरच्या व्हिडिओवर दिशाची गजब मागणी; चाहतेही म्हणाले, ‘छोटी बच्ची हो क्या?’

अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या ब्रेकअपची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला होता. प्रेक्षकांना त्यांची जोडी खूप आवडते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही कलाकार फिटनेस फ्रीक आहेत. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे ब्रेकअप झाल्याची बरीच चर्चा होत आहे. परंतु टायगरच्या नुकत्याच आलेल्या व्हिडिओवर, दिशा असं काही म्हणाली की, चाहते पुन्हा एकदा विचारात पडले आहेत. हे पाहून प्रेक्षक देखील आनंदी आहेत की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. सोबतच दिशाला ‘ब्रेकअप करू नका,’ असे सल्ले सुद्धा देत आहे.

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने त्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, टायगर त्याच्या मॉर्शल आर्ट कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना दिसला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, अभिनेता त्याच्या संपूर्ण ताकदीने समोरच्या व्यक्तीला जोरदारपणे मारहाण करीत आहे. हा व्हिडिओ शेअर करत टायगरने  कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला आज प्रशिक्षण करण्याची इच्छा नव्हती… म्हणून मुलांनी किक मारण्याचा निर्णय घेतला… ही माझी कल्पना नव्हती.” यासह, त्याने ‘ह्यूमनपंचिगबॅग’ आणि ‘गुडनाइट’ असे हॅशटॅग्जही दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

टायगरप्रमाणेच दिशालाही मारायचीये किक
टायगर श्रॉफच्या या जबरदस्त मार्शल आर्ट किकवर चाहते खूप खुश आहेत, दिशा पटानी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दिशाने कमेंट करताच चाहते आनंदी झाले आणि चाहत्यांना असे वाटू लागले की, दोघेही वेगळे झालेले नाहीत. ते दोघेही एकत्र आहेत. दिशा पटानीने कमेंट करत लिहिले की, “मलाही हे करायचे आहे.” दिशाच्या या कमेंटवर बऱ्याच चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दिशाला युजर्सचा रिप्लाय
कुणी “मॅडम, यासाठी तुम्हाला टायगर सरांसोबत ट्रेनिंगला जावं लागेल,” असा सल्ला दिला आहे. तसेच, कुणी “टायगरसोबत ब्रेकअप करू नका, तो चांगला माणूस आहे,” असे म्हणत आहे. कुणी एकत्र राहण्याची विनंती करत आहे. एकाने तर तिला “छोटी बच्ची हो क्या?,” असे म्हटले आहे. त्याचवेळी “असू दे, तू एक विल्हनवर लक्ष दे,” असे लिहिले आहे.

दिशाबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमात झळकली आहे. आता ती ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘योद्धा’ या आगामी सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
प्रमोशनसाठी ‘खिलाडी’ अक्षय घरातून पडला बाहेर, पण सेटवर पोहोचताच ढसाढसा लागला रडू; व्हिडिओ व्हायरल
दीपिकाचा बर्थडे : लग्नासाठी धर्म बदलल्याने कायम चर्चेत राहिलेली अभिनेत्री, बघा तिचे मुस्लीम नाव
‘तुझी चड्डी नाही उतरवली, तर आदित्य नाव नाही सांगणार’, वादाशी घट्ट नातं असणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक

Latest Post