Sunday, October 26, 2025
Home कॅलेंडर ‘तुझी आई अशीच म्हणतेय काय?’ पाहा रकुलप्रीतने कुणाचा घेतलाय खरपूस समाचार

‘तुझी आई अशीच म्हणतेय काय?’ पाहा रकुलप्रीतने कुणाचा घेतलाय खरपूस समाचार

आज सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियामुळे दूर असलेला प्रत्येक जण एकमेकांच्या अगदी जवळ आला आहे. पण म्हणतात ना नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे या सोशल मीडियाच्या देखील चांगल्या आणि वाईट अशा दोन बाजू आहेत. सोशल मीडियामुळे लोकांना खासकरून कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कलाकार आणि प्रेक्षक यांच्या मधला दुवा म्हणून सोशल मीडिया खूप लोकप्रिय आहे. मात्र याच सोशल मीडियामुळे कलाकारांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. याचा अनुभव अनेक कलाकारांना रोज येतच असतो. हाच अनुभव सध्या रकुलप्रीत सिंग या अभिनेत्रीला नुकताच आला आहे.

रकुलने एकदा तिचा ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर अनेकांनी भरपूर लाईक्स आणि कमेंट करत तिला तिच्या फोटोच्या पसंतीची पोचपावती दिली. काहींनी तिच्या या फोटोवर अनेक घाणेरड्या कमेंट्स देखील केल्या, मात्र यातच एकाने तिच्या या फोटोवर खूपच अश्लील कमेंट केली जी कमेंट रकुल दुर्लक्षित करू शकली नाही.

त्या व्यक्तीने तिच्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘ कारमध्ये सेशन झाल्यानंतर ही अभिनेत्री पॅन्ट घालायला विसरली आहे.’

ही कमेंट वाचून रकुलने लगेच त्या व्यक्तीला उत्तर देत लिहिले की, “मला वाटते की तुझ्या आईने देखील कारमध्ये खूप सेशन केले असतील, त्याचमुळे तू या गोष्टीत इतका माहीर दिसत आहेस. तुझ्या आईकडून या कार सेशनचे अजून जास्त डिटेल्स घेत थोडी अक्कल देखील घे. जोपर्यंत तुझ्यासारखे लोकं या जगात आहे तोपर्यंत स्त्रिया बिलकुल सुरक्षित राहणार नाही. फक्त समानतेच्या मुद्द्यावर भांडण करून सुरक्षा मिळणार नाही.”

रकुलचे अतिशय खरमरीत उत्तर दिल्यामुळे हे ट्विट जोरदार वायरल झाले होते.

३० वर्षीय रकुलने हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी तमिल,तेलुगु, कन्नड़ या भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. रकुल अजय देवगण दिग्दर्शित ‘मेडे’ या चित्रपटात अमिताभ बच्‍चन, अजय देवगन यांच्यासोबत दिसणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

वाचा थोडक्यात महत्त्वाचे
तुझी आई अशीच म्हणतेय काय? पाहा रकुलप्रीतने कुणाचा घेतलाय खरपूस समाचार
जरा चुकलंच हां! मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानची एक चुक आणि सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
काय सांगता इतकी मोठी चूक! देशातील या मोठ्या संस्थेकडून मौनी रॉयचे फोटो चुकून झाले ट्विट
तब्बल सतरा वर्ष फरहान अख्तरने केला सुखाचा संसार, ते लफड झालं अन्

हे देखील वाचा