अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या मनमोहक फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते ती अनेकदा तिच्या चित्रपटांशी संबंधित प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. चाहतेही अभिनेत्रीच्या पोस्टची वाट पाहत असतात. यादरम्यान, रकुल प्रीत सिंगने इंस्टाग्रामवर तिचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. रकुल स्विमिंग पूलमध्ये मजा करत असल्याची ही छोटी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रकुल प्रीतने मारली पाण्यात उडी
रकुलप्रीतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन बूमरॅंग व्हिडिओ शेअर केले आहेत. या दोन्ही व्हिडिओमध्ये ती पूलमध्ये मजा करताना दिसत आहे . पहिल्या व्हिडिओमध्ये रकुल प्रीत काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा स्विमिंग सूट घालून पायाने पाणी उसळताना दिसत आहे. यासोबत पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाचा स्विमिंग सूट घालून पूलमध्ये उडी मारताना दिसत आहे. या दोन्ही व्हिडिओमध्ये रकुल प्रीतचा बोल्ड अवतार दिसत आहे, त्यामुळे चाहत्यांचे हृदयाचे ठोके वाढत आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (rakul preet jumped in the swimming pool in a red swimsuit)
रकुलने एन्जॉय केला मास्क फ्री हॉलिडे
इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करताना रकुल प्रीतने लिहिले की, “मला मास्क फ्री हॉलिडेवर परत घेऊन जा.” रकुल प्रीतने अलीकडेच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी जॅकी भगनानीसोबत एक फोटो शेअर करून तिच्या नात्याची पुष्टी केली होती. इंस्टाग्रामवर हा रोमँटिक फोटो शेअर करण्याबरोबरच रकुल प्रीतने एक मोहक कॅप्शनही लिहिलं होतं.
रकुल प्रीत पाण्यात मजा करत असल्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाख 73 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, चाहते यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-वाढदिवसाचे औचित्य साधून रकुलप्रीत सिंगने केला ‘या’ निर्मात्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा
-रकुल प्रीत सिंगने केलीय प्लास्टिक सर्जरी? फोटो पाहुन नेटकऱ्यांनी साधला तिच्यावर निशाणा