रकुल प्रीत सिंगने केलीय प्लास्टिक सर्जरी? फोटो पाहुन नेटकऱ्यांनी साधला तिच्यावर निशाणा


अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही सध्या बहुचर्चित अभिनेत्री आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती नेहमी चर्चेत येते. रकुल प्रीत सिंग हे नाव दक्षिण इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. बॉलिवूडमध्येही तिने अनेक चित्रपटात काम केले. मात्र तिला खरी ओळख अजय देवगण आणि तब्बू स्टारर ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटातून मिळाली. रकुलच्या सौंदर्याचे आणि अदाकारीचे चाहते दिवाणे आहेत. परंतु या दिवसात असे काही घडले आहे की, ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काही युजर्सने तिच्या फोटोवर अश्लील प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच, रकुल प्रीत सिंगने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल होताच युजर्सने रकुल प्रीतला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. युजर्सना कदाचित त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीचे बदललेले रूप आवडले नसावे. “तू प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” असा प्रश्न अनेकांनी तिला केला. मग तिच्या फोटोवर ट्रोलर्सच्या कमेंट्सचा पुरच आला.

फोटो पाहून विचारले अनेक प्रश्न
खरं तर, रकुल प्रीतने शेअर केलेल्या फोटोत तिचे रूप पूर्णपणे बदललेले दिसत आहेत. तिने तिचे नाक बारीक केले असून, तिचे गाल देखील आतमध्ये गेलेले दिसत आहेत. यावरून चाहत्यांना वाटत आहे की, तिने चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे. फोटोवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

चाहते झाले हैराण
त्याचबरोबर हे फोटो शेअर करताना रकुलने कॅप्शन लिहिले की, “ऑन डिमांड पोस्ट.” यासोबतच तिने हसणारे इमोटिकॉन्स देखील पोस्ट केले आहेत. मात्र हा क्यूट फोटो पाहून युजर्सने तिला ट्रोल केले. तर काहींनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही कोण आहे?” तर दुसऱ्याने लिहिले की, “तिने प्लास्टिक सर्जरीही केली का, यार, बॉलिवूडच्या कलाकारांना काय झाले आहे? चांगल्या चेहऱ्याची वाट लावली.”

ड्रग्ज प्रकरणातही आले नाव
रकुल प्रीत ड्रग्ज प्रकरणाबाबतही सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. एलएसडी आणि एमडीएमए सारख्या महागड्या अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या सनसनाटी टोळीच्या संबंधात ईडीने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीच्या १० सेलिब्रिटींना बोलावले होते. त्यापैकी रकुल प्रीतच्याही नावाचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी

-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य


Leave A Reply

Your email address will not be published.