प्रेमळ जोडपं! पत्नी उपासनासोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसला सुपरस्टार राम चरण, लंच डेटचे फोटो व्हायरल


कलाकरांना त्यांच्या परिवाराला खूप कमी वेळ देता येतो. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कलाकार कधीकधी फक्त नावापुरतेच कुटुंबासोबत असतात. मात्र, असे असूनही काही कलाकार आवर्जून त्यांच्या परिवारासाठी वेळ काढतात आणि त्यांच्यासोबत काही काळ घालवतात. यात मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांचा समावेश आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अतिशय हँडसम आणि सुपरस्टार असलेला अभिनेता म्हणजे राम चरण. आपल्या वडिलांच्या म्हणजेच चिरंजीवींच्या पावलावर पाऊल ठेऊन राम चरण देखील या क्षेत्रात आला आणि त्याने तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. आता अचानक राम चरण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याचा सध्या व्हायरल होणारा फोटो. त्याच्या बायकोसोबत जेवणासाठी गेला असतानाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राम चरण त्याच्या पत्नीसोबत उपासनासोबत दिसत आहे. नुकतेच हे दोघं एका लंच डेटला गेले होते. त्यावेळचा त्यांचा फोटो फॅन्समध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

या फोटोमध्ये उपासना आणि राम चरण एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहे. उपासनाने हा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत लिहिले, “आठवड्याच्या मध्येच, खूप दिवसांनी आम्ही लाँच ब्रेकवर, बऱ्याच दिवसांनी बाहेर जेवायला आलो आहोत.”

हे दोघं नेहमी त्यांच्या सुखी आणि आनंदी वैवाहिक जीवनाचे दर्शन फोटोंद्वारे फॅन्सला करतच असतात. उपासना आणि राम चरण दोघेही अगदी भिन्न स्वभावाचे आहेत. राम चरण लाजाळू आणि लवकर कोणात न मिसळणारा आहे, तर दुसरीकडे उपासना अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि स्वतःचे मत बिंधास्तपणे व्यक्त करते.

रामचरण आणि उपासना हे दोघेही अगदी कॉलेजपासून खूप चांगले मित्र होते. एकमेकांसोबत लहानलहान गोष्टी देखील ते दोघं शेअर करायचे. त्यांच्यात असलेले खास नाते त्यांचे मित्र आणि कुटुंबाला नेहमी जाणवायचे. मात्र, त्या दोघांना कधीच जाणवले नाही.

जेव्हा राम चरण त्याच्या कामानिमित्त भरपूर प्रवास करायला लागला, त्यानंतर त्या दोघांना एकमेकांची खूप आठवण यायची. त्यानंतर त्यांना ते प्रेमात पडल्याचे जाणवले. राम चरणच्या ‘मगधीरा’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि २०११ मध्ये साखरपुडा केला. पुढे त्यांनी २०१२ साली लग्न केले. १४ जून, २०१२ रोजी अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांनी लगीनगाठ बांधली.

राम चरण आणि उपासना यांच्या लग्नाला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, आजही त्यांच्यात खूप प्रेम आहे. फॅन्समध्ये देखील ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे, आणि हे दोघेही देखील आपल्या फॅन्ससोबत अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.