Sunday, June 23, 2024

‘आरआरआर’चे नवे ‘जननी’ गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला, देशभक्ती पाहून तुम्हीही व्हाल भावुक

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सतत चर्चेत आहे. तसेच या चित्रपटातील ‘जननी’ या तिसऱ्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. शनिवारी (२७ नोव्हेंबर) हे गाणे रिलीझ झाले असून, हे गाणे ऐकणारा प्रत्येक व्यक्ती नक्कीच भावूक झाला असणार. तसेच त्याच्या मनात देशभक्ती जागृत झाली असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या गाण्यात राम चरण, जूनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट भावूक होताना दिसत आहेत.

‘जननी’ या गाण्यात स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. जे पाहून सगळेच भावूक होत आहेत. राम चरणने सोशल मीडियावर हे गाणे रिलीझ झाल्याची माहिती दिली आहे. गाण्याचे पोस्टर शेअर करताना राम चरणने लिहिले, “जननी… व्यक्त करते, उत्सव साजरा करते आणि प्रतीक करते.” (ram charan jr ntr ajay devgn starrer rrr new song janani out)

जननी या गाण्याबद्दल सांगायचे झाले, तर ते गायक एमएम करीम आणि कोरस यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल वरुण ग्रोवरने लिहिले असून, संगीत दिग्दर्शन एमएम करीम यांनी केले आहे. ‘आरआरआर’चे यापूर्वी ‘नाचो नाचो’ आणि ‘दोस्ती’ ही दोन गाणी रिलीझ झाली आहेत. ज्यांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.

‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची कथा दाखवण्यात येणार आहे. बंडखोरी आणि संघर्षाचा काळ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. ‘बाहुबली’नंतर राजामौली यांचा हा बिग बजेट चित्रपट आहे. ज्याचे बजेट तब्बल ४५० कोटी आहे. हा चित्रपट ७ जानेवारी २०२२ रोजी तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

-Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा