Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

नताशा-हार्दिकच्या विभक्तीवर राम गोपाल वर्मांचा निशाणा? लग्न आणि घटस्फोटावर वादग्रस्त पोस्ट

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा हिने आपल्या घटस्फोटाची घोषणा सोशल मिडीया हॅडल इंस्टाग्राम वरून सर्वत्र केली. त्यांच्या नात्यात दूरावा आल्याच्या बातम्या या मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. पण त्यांनी यावर न बोलून विषय टाळला होता. त्यावर निर्माते दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी वादग्रस्त विधान करणारी पोस्ट टाकली आहे केलं आहे. त्यामूळे सगळ्या सोशल मिडियीवरील लोकांच लक्ष त्यांच्याकडे वळले आहे.

राम गोपाल वर्मा हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ओळखले जातात. यातच हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या वेगळं होण्याच्या पोस्ट नंतर त्यांनी आपल्या एक्स हॅंडल वर एक नोट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, :लग्न हे नरकात होत असत,तर घटस्फोट हा स्वर्ग होतो.” त्यांनी दुसऱ्या नोटमध्ये लिहीले आहे की, ” मला आश्चर्य वाटते की आजचे लग्न प्रत्यक्षात इतकेच दिवस टिकेल जेवढे आई- वडील लग्नातचे फक्शन करतात.”

राम गोपाल वर्मा अजून एक वेगळी नोट पोस्ट करून लिहीतात की, “म्हातारपणी लक्ष कोणी लक्ष द्यायला लग्न करण्यापेक्षा पैसे देऊन एक नर्स ठेवणे खूप चांगला पर्याय आहे. नर्स हि पैसे देऊन काम करेल, तर एक पत्नी तुम्हाला कायम दोषी असल्याच भासवून देइल.”

राम गोपाल वर्मा एवढच लिहून थांबले नाही त्यांनी अजूक एक ट्विट केल. त्यात त्यांनी लिहिलं ,”प्रेम हे अंधळ असत, तर लग्न हे डोळे उघडणार असत.एक लग्न तेव्हाच चालू शकत जेव्हा तुमच्यात एकाच व्यक्तित सारखं सारखं प्रेम करण्याची क्षमता असेल.” हार्दिक आणि नताशा यांनी आपल्या घटस्फोटाच्या पोस्टमध्ये हे देखील सांगितल आहे की ते आपला मूलगा अगस्त्य याचं पालन पोषण मिळून मिसळून करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘धर्मवीर 2’मधून आनंद दिघे यांचा अपमान, संजय राऊत यांचा चित्रपटाच्या निर्मात्यांवर मोठा आरोप
नताशापासून दूर जाताच हार्दिकची अनन्यासोबत झाली गट्टी ? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले फॉलो

 

हे देखील वाचा