भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने १८ जूलैला त्याची पत्नी नताशासोबतच्या घटस्फोटची बातम सोशल मिडियावे शेअर केली. त्यांच्या घटस्फोटच्या बातम्या चालू असतानाच आता हार्दिकचे नाव एका बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले जात आहे. त्यामुळे या चर्चाना देखील चांगलेच उधाण आलेले आहे.
टिम इंडियाचा प्लेयर हार्दिक पांड्या आणि बॉलीवूडची अभिनेत्री अनन्या पांडे यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना फॅालो करायला सुरुवात केली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न समारंभात हार्दिक आणि अनन्या यांचा सोबत डांस करतानाचा विडिओ खूप वायरल होत आहे. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना फॅालो केले आहे. आता सोशल मिडियावर या दोघांबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तर बघूयात काय चर्चा होत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात हार्दिक आणि अनन्या सोबत फिरताना आणि वरातीत नाचताना दिसले. दोघांचा डान्सचा विडिओ इंटरनेट खूप वायरल होत आहे. आणि लोक त्याला खूप पसंती देत आहेत. त्यात हार्दिक आणि अनन्या, रणवीर सिंह, शनाया कपूर, अनिल कपूर आणि अनेक ‘लड़की आंख मारे’ गाण्यावर डांस करताना दिसत आहेत. जसा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल झाला तसं नेटकऱ्यांनी हार्दिक आणि अनन्या यांच्यात काहीतरी केमिस्ट्री बनते आहे. असा अंदाज नेटकरी लावत आहेत.
काही दिवसांपूर्वी नताशा आणि हार्दिक या दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. आईपीएल 2024 संपल्यानंतर या दोघांच्या लग्नात समस्या सुरू असल्याची चर्चा सोशल मिडियावर पसरत होती.१६ जूलैला नताशा आपल्या आई वडीलांच्या घरी गेली. नताशा आणि तिचा मुलगा अगस्त्य यांना एरपोटवर स्पॅाट केले गेले.
मागच्या काही दिवसात अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचही ब्रेकअप झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. पण त्यावर अजूनही अनन्या आणि आदित्य रॉय कपूर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘मला स्वतःची खूप किंमत आहे…’ स्टार किड्सच्या ट्रोलिंगवर जान्हवी कपूरने स्पष्टपणे मांडले मत
आमिर खानसोबतच्या घटस्फोटावर किरण राव म्हणाली, ‘माझ्या आनंदासाठी घेतलेला निर्णय होता’