अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रामसेतू’ चित्रपट अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागलेली असतानाच प्रदर्शनाआधीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील कथेमुळे हा वाद निर्माण झाला असून अभिनेता अक्षय कुमारवर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. या वादानंतर आता रामसेतू चित्रपटाला कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
अभिनेता अक्षय कुमारने राम सेतू चित्रपटाची घोषणा केल्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. रामसेतू चित्रपट ऑक्टोंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा, सत्यदेव कंचराना, हे कलाकार झळकणार आहेत. परंतु सध्या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या टीमविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटात रामसेतूची घटना चुकीच्या पद्धतीने दाखवली आहे तसेच सत्य कथेमध्ये मोडतोड केल्याचा आरोप लावला आहे.
याबद्दलचे भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांचे ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी “माझ्या तक्रारीला माझे सहकारी वकील सत्या सभ्रवाल यांनी अंतिम स्वरुप दिले असून यासोबतच मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडियावर चित्रपटातील चुकीच्या कथेविरोधात तक्रार दाखल करणार आहोत,” असे म्हणले आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी “अभिनेता अक्षय कुमार हा विदेशी नागरिक असून त्याला अटक करुन देशातून हाकलून देऊ शकतो,” असे म्हणले आहे. दरम्यान, दिवाळी २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटाचा पोस्टर इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला होता.
हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम डिम्पी गांगुली तिसऱ्यांदा झाली आई, शेअर केला नैसर्गिक प्रसूतीचा अनुभवबिपाशा बासू अन् करण सिंग ग्रोव्हर होणार आहेत पालक? लवकरच करू शकतात अनाउंसमेंट‘मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार…’ तनुश्री दत्ताची भलीमोठी पोस्ट चर्चेत