Tuesday, May 28, 2024

‘मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार…’ तनुश्री दत्ताची भलीमोठी पोस्ट चर्चेत

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana patekar) आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushri Datta) यांचा वाद सिने जगतात चांगलाच गाजला होता. यावेळी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले होते. हा वाद काही काळ शांत झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. याबद्दलची तिची भली मोठी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पोस्टमध्ये इतरही व्यक्तींची नावे घेत तिने धक्कादायक आरोप केले आहेत. 

तनुश्री दत्ता ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करुन तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली  आहे. सध्या ती सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. सध्या तिची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून या पोस्टमधून तिने नाना पाटेकर यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. याबरोबरच तनुश्रीने मला काहीही झाले तरी त्याला फक्त नाना पाटेकरच जबाबदार असतील असेही धक्कादायक वक्तव्य केले आहे.

 

या पोस्टमध्ये तनुश्री दत्ताने लिहले आहे की, “जर मला काही झाले तर मीटूमधील आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, सहकारी आणि बॉलिवूडमधील त्यांचे माफिया मित्र जबाबदार असतील. जे माफिया कोण आहेत यांची नावे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात समोर आली आहेत. या लोकांचे चित्रपट अजिबात पाहू नका. त्यावर बहिष्कार घाला. त्यांचे जगणे मुश्किल करुन टाका. कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. मला या देशाच्या न्यायालयावर विश्वास नाही पण देशातील नागरिकांवर खूप विश्वास आहे. जय हिंद.” तनुश्रीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘मी विजयला अर्धनग्न पाहिलंय, आता मला पूर्ण…’, ‘या’ अभिनेत्रीचा थेट करण जोहरसमोरच मोठा खुलासाविजय देवरकोंडा करतोय नॅशनल क्रशला डेट? सहकलाकाराचा खुलासाबाप रे! बाराशेपेक्षा अधिक गाणी गाऊन मिळवली प्रतिष्ठा, ‘त्या’ एका कृत्याने घालवली सगळी इज्जत

 

 

हे देखील वाचा