Friday, March 29, 2024

कोट्यवधी खर्च करून रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायणातून किती झाली कमाई आहे का माहिती? घ्या जाणून

रामानंद सागर यांचे रामायण संपून तब्बल तीन दशकांपेक्षा जास्त काळ झाला आहे. मात्र आजही त्या रामायणाची तुफान चर्चा होते. नेहमीच ते रामायण कलाकारांमुळे, पुनःप्रक्षेपीत केल्यामुळे सतत गाजतच आहे. कोरोनाकाळात हे रामायण पुन्हा टीव्हीवर दाखवले गेले आणि तेव्हा देखील त्याने टीआरपीच्या सर्वच रेकॉर्ड मोडले. आजवर रामायणावर टेलिव्हिजनच्या इतिहासात अनेक शो बनवले गेले. मात्र या रामानंद सागर यांच्या रामायण शोने जी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली ती काही औरच होती. त्याकाळी जास्त तंत्रज्ञान विकसित नसताना काही ऍनिमेशन नसताना रामानंद सागर यांनी बनवले कसे? त्यांना यासाठी किती खर्च आला असे? त्यांना नफा किती झाला असेल? असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतील. चला तर जाणून घेऊया या रामायणाच्या खर्चाबद्दल आणि त्यांच्या नफ्याबद्दल.

रामानंद सागर यांनी रामायण अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने बनवले होते. त्यांनी अगदी जीव ओतून यावर काम केले. त्यांच्या मेहनतीचे आणि कष्टाचे फळ त्यांना मिळाले. दर्शकांनी या शोचे स्वागत मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात हृदयाने केले. रामानंद सागर यांनी देखील शोच्या प्रत्येक भागावर अजोड काम केले. तो जास्तीत जास्त चांगला करण्यासाठी त्यांनी हर प्रयास केला. अनेक मीडियामधील रिपोर्ट्सनुसार त्याकाळी रामानंद सागर यांना एका भागासाठी लाखो रुपये खर्च यायचा. मात्र तरीही त्यांनी त्याचा विचार केला नाही पाण्यासारखा पैसा शोसाठी वापरला.

दरम्यान रामानंद सागर यांना एक भाग बनवण्यासाठी ९ लाख खर्च यायचा. तर ते एका भागावर ४० लाख रुपये कमवायचे. अर्थात ७८ भागांची रामायण ही मालिका बनवण्यासाठी रामानंद सागर यांना ७ कोटी रुपये लागले. तर निर्मात्यांनी या शोमधून ३१ कोटी ४ लाख रुपये कमावले होते. आज देखील या शोला आणि कलाकारांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळते. या शोने काम करणाऱ्या सर्वच कलाकारांना एक मोठी आणि कधीही न पुसता येणारी अशी ओळख निर्माण करून दिली आहे.

रामायणामध्ये अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांनी राम आणि सीता या भूमिका साकारल्या होत्या. या दोघांना तर अमाप प्रेम मिळाले. त्यांना लोकांनी अक्षरशः देवाचाच दर्जा दिला होता. ते दिसतील तिथे त्यांना नमस्कार करणे, सही घेणे आदी अनेक गोष्टी त्या काळी सर्रास व्हायच्या. अनेकदा या कलाकारांनी त्यांचे अनुभव विविध मुलखतीमधून मांडले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा