Tuesday, April 23, 2024

‘आदिपुरुष’च्या संपूर्ण टीमला जिवंत जाळलं पाहिजे’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक विधान; लगेच वाचा

आभिनेत्री क्रिती सेनाॅन, प्रभास आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष‘ हा चित्रपट लोकांच्या निशाण्यावर आहे. चित्रपटातील संवाद आणि व्यक्तिरेखा यावर सगळेच सातत्यानं टिका करत असल्याचं बघायला मिळत आहे. रिलीज झाल्याच्या दिवसापासून ‘आदिपुरुष’ चित्रपटाने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

रिलीजपूर्वी चित्रपटाचे मुख्य कलाकार क्रिती सेनाॅन आणि प्रभास जोरदार प्रमोशन करत होते. मात्र, आता दोघेही गप्प बसले आहेत. या चित्रपटावर प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आदिपुरुष’ (Adipurush)चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. ‘रामायण’ किंवा ‘महाभारत’सारख्या प्रचंड पौराणिक प्रकल्पांशी संबंधित लोक चित्रपटाला शिव्याशाप देत आहेत.

अशातच अभिनेते मुकेश खन्ना यांनी या चित्रपटाबाबद मोठ वक्तव्य केल आहे. ते म्हणाले की, “भारतातील 100 कोटी हिंदूंनो जागे व्हा आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे प्रकाशन थांबवा. या प्रकाशनाच्या निषेधात सामील व्हा. या ‘आदिपुरुष’च्या संपूर्ण टीमला जिवंत जाळलं पाहिजे.” त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही लोक मुकेश खन्ना यांना केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर अनेक लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा ट्रेंड कायम दिसत आहे. ऍडव्हान्स बुकिंगमुळे या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. पण आता हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. चित्रपटाची कमाई झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. (Actor Mukesh Khanna made a sensational statement about the movie Adipurush)

अधिक वाचा- 
‘कचरापेटीतलं अन्न खाऊन काढले दिवस’; ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाची कहाणी ऐकून पूजा भट्ट ढसाढसा रडली
अफेअरच्या चर्चेदम्यान इब्रहिम अली खान अन् पलक तिवारीचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा