दूरदर्शनवर येणारे रामानंद सागर यांच्या ‘रामायण‘ या मालकिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले. कोरोनाच्या काळात ‘रामायण’ पुन्हा प्रसारित केल्यामुळे आजच्या मुलांनाही समजले की, लोक पौराणिक कार्यक्रमाच्या कथा पुन्हा पुन्हा का सांगतात. रामानंद सागरच्या ‘रामायण’मधील राम म्हणजेच अरुण गोविल असो किंवा सीता म्हणजेच दीपिका चिखलिया असो, आजही लोकांना त्याच अवतारात पाहायला आवडते. अशात रामनवमीच्या दिवशी ‘रामायण’च्या सीतेने पुन्हा एकदा 35 वर्ष जुने रूप घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
सण 1987 मध्ये प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिका ‘रामायण’ मधील प्रत्येक पात्र आजही स्मरणात आहे. मात्र, अशीही काही पात्रं आहेत, ज्यांची प्रतिमा लोकांच्या नजरेत स्थिरावली आहे. त्यापैकीच एका शोमध्ये सीतेचा भूमिका साकारणारी दीपिका चिखलीयाही आहे. भगव्या रंगाच्या साडीत सीतेचा अवतार घेऊन त्या पुन्हा एकदा रामाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या दिसत आहे.
दीपिका चिखलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असताता. त्या अनेकदा या शोशी संबंधित किस्से देखील सांगतात. रामनवमीच्या दिवशी त्यांनी माता सीतेचा अवतार घेतला, जे पाहून चाहते जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या भगव्या रंगाची साडी परिधान करून भगवान रामाची पूजा करताना दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दीपिका यांनी लिहिले की, ‘ही तीच साडी आहे, जी मी लव कुश घटनेच्या वेळी परिधान केली होती.’
अशात अभिनेत्रीचे चाहते तिच्या या पोस्टचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले की, ‘तुम्हा सर्वांना देवाने कलियुगातील राम आणि सीता बनवले आहे.’, दुसऱ्या युजरने कमेंट करत म्हटले की, ‘मॅडम, आम्ही सर्वजण या तीन इन्स्टा पोस्टसाठी तुमचे सदैव ऋणी राहू, धन्य वाटते’. अशात एका साेशल मीडिया युजरने लिहिले की, ‘हे शेअर केल्याबद्दल आपल्या सर्वांकडून धन्यवाद! अनेकांना तुम्हाला पुन्हा एकदा सीताजींच्या रुपात पाहायचे होते.’
View this post on Instagram
मंडळी, काही दिवसांपुर्वी दीपिका आणि अरुण यांनी पुन्हा एकदा दोघे पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी त्यांच्या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती दिली नाही.(ramayan fame deepika chikhaliya in maa sita look on ram navami 2023 donned luv kush kand saree)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दबंग खानला दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानवर दाखल ‘ती’ एफआयआर केली रद्द
‘समर सिंगला फाशी द्या…’, म्हणत आकांक्षा दुबेच्या आईने योगी सरकारकडे केली न्यायाची मागणी