Thursday, February 22, 2024

दबंग खानला दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानवर दाखल ‘ती’ एफआयआर केली रद्द

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच्यावर २०१९ साली पत्रकारासोबत मारपीट आणि दुर्व्यव्हार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्या एफआयरला रद्द केले आहे. २०१९ साली सलमान आणि त्याचा बॉडीगार्ड असणाऱ्या नवाज विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

जस्टीस भरती डांगरेने निर्णय सांगताना म्हटले की, “सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड नवाज शेख यांच्याकडून दाखल केलेल्या तक्रारीला स्वीकारले जात आहे. कोर्टाने सलमानच्या विरोधात लावलेल्या सर्व आरोपांना चुकीचे म्हटले आहे. हायकोर्टाने मागच्यावर्षी खालच्या कोर्टाने जरी केलेल्या सलमान आणि नावज विरोधातील प्रक्रियेला देखील फेटाळले आहे.

तत्पूर्वी मार्च २०२२ साली एका मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमानला आणि नावाजला समन जरी करत ५ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दोघांना हा आदेश पत्रकाराच्या तक्रारींवर देण्यात आला होता. २०१९ साली अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने सलमान आणि नवाज यांच्या विरोधात मारपीट आणि अभद्र भाषेत बोलणे अशी एक तक्रार दाखल केली होती. त्याने अंधेरी मॅजिस्ट्रेटमध्ये प्रथम ही तक्रार दाखल केली होती.

मागच्या यावर्षी एप्रिल महिन्यात सलमान खानने समनला आव्हान देताना हायकोर्टात केस दाखल केली. एप्रिल २०२२ हायकोर्टाने सलमानच्या याचिकेवर होणाऱ्या सुनावणीला थांबवले. सलमानच्या बॉडीगार्डने देखील पत्रकाच्या समनला हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर पण कोर्टाने रोक लावली.

पत्रकाराने त्याच्या सांगितलेल्या जबाबात म्हटले होते की, सलमान खानचा फोटो घेण्यावरून सलमान आणि नावाजने त्याच्यासोबत मारपीट केली होती. तर सलमानने त्याच्या तक्रारतीत हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. आज सलमानला या प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…

‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा