अंमली पदार्थ आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासात अनेक टॉलिवूड कलाकारांची नावे समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपला तपास अधिक तीव्र केला आहे. यापूर्वी अनेक कलाकारांची कसून चौकशी करण्यात आली आहे. टॉलिवूड अभिनेता राणा डग्गुबती हैदराबाद ईडी कार्यालयात पोहोचला. ईडीच्या तपासादरम्यान टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक कलाकारांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सतत चौकशी केली जात आहे. नुकताच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग गुरूवारी (३ सप्टेंबर) ईडीच्या हैदराबाद कार्यालयात पोहोचली होती, जिथे तिची कसून चौकशी करण्यात आली.
रकुलची चौकशी तब्बल पाच तासांपेक्षा जास्त वेळ सूरू होती. पुरी जगन्नाथ यांना ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले होते. २ सप्टेंबर रोजी या प्रकरणात चार्मी कौरचीही चौकशी करण्यात आली होती. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाने रकुल प्रीत, राणा डग्गुबतीसह १२ कलाकारांना नोटिसा बजावल्या होत्या. २०१७ मध्ये १२ कलाकारांची ड्रग्ज प्रकरणात विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी केली होती. आता राणाचीही अनेक तास चौकशी केली जाईल.
#ranadaggubati at ED office in Hyderabad pic.twitter.com/XQiTzTHhqY
— ARTISTRYBUZZ (@ArtistryBuzz) September 8, 2021
विशेष तपास पथकाने २०१७ मध्ये टॉलिवूड कलाकारांच्या विरोधात तपास सुरू केला होता. यामध्ये रवी तेजा, रकुल आणि इतर अनेक कलाकारांची चौकशी करण्यात आली. एसआयटीने टॉलिवूड कलाकारांसह सुमारे ६२ संशयितांवर आक्षेप घेतला होता. मात्र, आतापर्यंत कोणत्याही कलाकारांविरोधात आरोपपत्र दाखल झालेले नाही. त्याच वेळी, अद्यापही ड्रग्ज घेण्याच्या बाबतीत कोणत्याही कलाकाराचा सहभाग होता की नाही हे उघडकीस आले नाही.
दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच राणाने बिपाशू बासू, अक्षय कुमार यांच्यासोबतदेखील स्क्रीन शेअर केली आहे. अभिनयाच्या जोरावर लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या राणाने बाहुबली चित्रपटातील ‘भल्लालदेव’ या खलनायकी भूमिकेतूनही प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन
-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी
-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे