Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड आलिया भट्टला नववधूच्या वेशात पाहून भावुक झाला तिचा बॉडीगार्ड, म्हणाला ‘आज माझे हृदय…’

आलिया भट्टला नववधूच्या वेशात पाहून भावुक झाला तिचा बॉडीगार्ड, म्हणाला ‘आज माझे हृदय…’

संपूर्ण बॉलीवूडला आणि चाहत्यांना ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस अखेर आला आणि रणबीर कपूर आलिया भट्ट हे लग्नबंधनात अडकले. त्य्नाच्या लग्नाची त्यांच्या फॅन्ससोबतच कुटुंबियांना देखील खूपच उत्सुकता होती. आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिलला मुंबईमध्ये लगीनगाठ बांधली आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच जल्लोष झाला. पंजाबी पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले आहेत. आलिया भट्ट आता मिसेस आलिया रणबीर कपूर झाली आहे. त्या दोघांच्या लग्नानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त याच लग्नाच्या चर्चा रंगलेल्या दिसत आहे. सोशल मीडियावर देखील याच लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या दोघांचे लग्नाचे फोटो पाहून त्यांच्यावर सर्वच स्तारुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. बॉलिवूडमधील कलाकारांसोबतच त्यांचे फॅन्सदेखील त्यांना आशीर्वाद देत त्यांचे अभिनंदन करत आहे.

अशातच सोशल मीडियावर रणबीर आणि आलिया यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, ही पोस्ट आणि पोस्ट करणारी व्यक्ती सध्या चांगलीच गाजत आहे. बॉलिवूडमधील कलाकारांव्यतिरिक्त शुभेच्छांची सर्वात जास्त व्हायरल होणारी पोस्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीची नसून ती पोस्ट आहे आलियाचे बॉडीगार्ड असणाऱ्या सुनील तालेकर आणि यूसुफ इब्राहिम यांची. या दोघांनी त्यांच्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास नोट लिहीत नवदाम्पत्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

बॉडीगार्ड सुनीलने लिहिले, “तुझ्या छोट्या हातांना पकडण्यापासून ते आज तुला नववधूच्या रूपात बघितल्यानंतर माझे हृदय आनंदाने भरून आले आहे.” या पोस्टसोबत सुनीलने त्याचा आलिया आणि रणबीरसोबतचा एक सुंदर फोटोदेखील शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट आलियाने देखील लाईक केली असून, नेटकऱ्यांनी देखील या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने यावर कमेंट करताना लिहिले, “आतापर्यंतचे सर्वात सुंदर कॅप्शन”, अजून एकाने लिहिले, “हो मला नक्कीच त्यांच्या भावना समजत आहे.”, अजून एकाने लिहिले, “आतापर्यतची सर्वात सुंदर नवरी”, एकाने ते रणबीर आणि सुनील दोघांनाही आलियाचे बॉडीगार्ड म्हटले. याशिवाय रणबीर कपूरच्या बॉडीगार्डने देखील या दोघांना शुभेच्छा देताना लिहिले, “अभिनंदन मिस्टर आणि मिसेस कपूर.”

अतिशय खासगी समारंभात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आलिया आणि रणबीर यांनी लग्न केले असून, लग्नानंतर कोणतेही रिसेप्शन होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा