असे काय झाले की, ज्यामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती रुबीना? मनात येत होता आत्महत्येचा विचार


रुबीना दिलैक हे टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध नाव आहे. छोटी बहू आणि शक्ती-अस्तित्व सारख्या शोद्वारे तिने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली. जेव्हा रुबीना ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली तेव्हा तिच्या चाहत्यांची यादी लक्षणीय वाढली. या शोनंतर प्रेक्षकांना ती खूपच आवडली. मात्र, यादरम्यान रुबीनाने घटस्फोटाचा खुलासा केला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की, रुबीना तिच्या पहिल्या नात्यातल्या ब्रेकअपमुळे डिप्रेशनची शिकार झाली होती.

रुबीनाने केला खुलासा 
माध्यमांशी खास संवाद साधताना रुबीनाने (Rubina Dilaik) तिच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या दु:खाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. रुबीनाने माध्यमांशी झालेल्या एका खास संवादात सांगितले होते की, जेव्हा ती छोटी बहू मालिकेतील सहकलाकार अविनाश सचदेवपासून वेगळी झाली होती, तेव्हा ती तासंतास एकटी बसायची आणि वेगळ्याच विचारात मग्न होती.

रुबीना झाली होती डिप्रेशनची शिकार 
रुबीनाने या खास संवादात सांगितले की, ती तिच्या कठीण काळात कुटुंबापासून दूर राहिली होती आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचारही येत होते. ती तिच्या नैराश्याच्या शिखरावर पोहोचली होती. तिने उघड केले की ७-८ वर्षांपूर्वी ती नैराश्याच्या टप्प्यातून गेली होती जिथे तिला अस्थिर, अतिमहत्त्वाकांक्षी आणि असुरक्षित वाटत होते.

मित्र-परिवारापासून दूर होती रुबीना
खुलासा करताना रुबीनाने सांगितले की, त्यावेळी तिला काय करावे हेच समजत नव्हते. मित्रमैत्रिणी, लोक आणि कुटुंबीयांच्या प्रश्नांनी ती इतकी अस्वस्थ झाली होती की तिला काय करावे समजत नव्हते. ती म्हणाली की, “त्यावेळी मला कोणी समजू शकणार नाही असे मला वाटायचे. त्यामुळे मी माझ्या मित्रांपासून तसेच माझ्या कुटुंबापासून दूर होते.”

डिप्रेशनवर केली मात
रुबीनाने माध्यमांना सांगितले की, “मी स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि मी डिप्रेशनशी लढा देण्यासाठी प्रेरक ऑडिओ क्लिप ऐकत असे.” तिने उघड केले की, तिने एक सेल्फ-हेल्फ कोर्स सुरू केला आहे जेणेकरून तिला काय होत आहे ते समजू शकेल. रुबीनाने सांगितले की, तिने अनेक ऑनलाइन समुपदेशन थेरपी घेतल्या आणि पुस्तकांचीही मदत घेतली.

एक वर्ष लागले
रुबीनाने पुढे सांगितले की, यातून बाहेर पडण्यासाठी तिला एक वर्ष लागले. त्यानंतर तिच्या आयुष्यात अभिनव शुक्ला आला. त्यांचे वैवाहिक जीवन सोपे नसले तरी दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. अभिनव आणि रुबीना आज आनंदी जीवन जगत आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!