×

‘इवलीशी एक मूठ’ कवितेतून स्पृहाने मांडली स्वप्न पाहणे देखील अवघड वाटणाऱ्या मुलांची व्यथा

स्पृहा जोशीचे यूट्यूब चॅनेल आणि त्या चॅनेलवरील तिचे सर्वच व्हिडिओ तुफान गाजत आहे. स्पृहाचे चाहते सतत तिच्या या व्हिडिओंवर कमेंट्स करत ते आवडत असल्याची पोचपावती तिला देताना दिसत आहे. स्पृहा नेहमीच या चॅनेलच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या फर्माईशी तर पूर्ण करतेच सोबतच विविध कवितांचे वाचन, खास दिवसांचे औचित्य साधून त्यांना अनुसरून कार्यक्रम देखील घेते. खूपच कमी काळात स्पृहाचे हे व्हिडिओ आणि यूट्यूब चॅनेल चांगेलच लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाले आहे. स्पृहाने पोस्ट केलेल्या नुकत्याच एका व्हिडिओमध्ये तिच्यासोबत लाईव्ह प्रेक्षक देखील पाहायला मिळाले.

स्पृहाने या भागात ऐकवलेली ‘इवलीशी एक मूठ’ ही कविता स्पृहाने सांगितले की, नागराज मंजुळे यांचा ‘फॅन्ड्री’ सिनेमा पाहिल्यानंतर तिने केली. काही लहान मुलांसाठी स्वप्न पाहणे किती अवघड असते, आणि पाहिलेली स्वप्न पूर्ण होते देखील किती अवघड असते. यावर आधारित ही कविता आहे.

इवलीशी एक मूठ

त्यात इवलंसंच स्वप्न
चुरगाळलेलं मन,
त्याचं इवलंसंच मागणं.

इवल्या खांद्यावरती
इतकं मोठं ओझं,
थकले इवले डोळे
आणि करपली नीज,

कुठले मंद वारे
आणि कसले शांत तारे
इवल्या कानांसाठी
नाही पाखरांचे गाणे

इवले दोन हात
तरी लावतात दिवा
इवल्याशा सुखासाठी
इवलासा ठेवा.

गोष्ट सरे, रात्र उरे
चिमणी उडे भुर्र,
हरवलं स्वप्न इवलं
कुठे दूर दूर..

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि त्यांच्या विचारांच्या जवळ जाणारी ही कविता स्पृहाला फर्माईश म्हणून आल्याने ती खूपच खुश होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post