Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड हातात त्रिशूल, डोळ्यात आग दिसणारा रणबीर कपूर घेऊन येत आहे, ‘ब्रह्मास्त्र’, पाहा सिनेमाचे मोशन पोस्टर

हातात त्रिशूल, डोळ्यात आग दिसणारा रणबीर कपूर घेऊन येत आहे, ‘ब्रह्मास्त्र’, पाहा सिनेमाचे मोशन पोस्टर

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. १५ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यासोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. रणबीर कपूरच्या या सिनेमाची चर्चा मागील बऱ्याच काळापासून मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये सुरु आहे. या सिनेमाच्या मोशन पोस्टर लॉन्चचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. हा सिनेमा पुढच्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची मुख्य बाब म्हणजे या सिनेमातून रणबीरचा आजवर कधीही न पाहिलेला लूक आणि अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे हे पोस्टर पाहिल्यावर चित्रपटाची भव्यता आणि व्हीएफएक्स पाहण्याजोगे दिसत आहे. त्याचा लूक खूप काही वेगळा नसला तरी रणबीर साकारत असलेला ‘शिवा’ हा सामान्य माणूस नाहीये. त्याच्याकडे काही सुपरनॅचरल शक्ती असून, त्याच्या हातात त्रिशूल, डोळ्यात आग असा हा वेगळा वाटणारा ‘शिवा’ सध्या भाव खाऊन जात आहे.

या मोशन पोस्टरच्या बॅकग्राऊंडला रणबीरचा आवाज ऐकू येत तो म्हणतो, “जगात काहीतरी जळत
आहे ईशा, असे काही जे सामान्य लोकांच्या नजरेच्या पार आहे. काही जुन्या शक्ती आहेत, काही अस्त्र आहेत.” यानंतर आलियाचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते, “हे सर्व तुला का दिसत आहे. तू कोण आहेस शिवा?” दिल्लीमध्ये त्यागराज स्टेडियममध्ये हा सोहळा संपन्न झाला. यावेळी रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अयान मुखर्जी यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक आठवणी आणि हा सिनेमा कसा स्पेशल आहे हे सांगितले. यावेळी रणबीर कपूर ऋषी कपूर यांची आठवण काढत भावुक देखील झाला.

या सिनेमात रणबीर, आलियासोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया, नागार्जुन आदी कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ९ सप्टेंबर २०२२ ला प्रदर्शित होईल.

हेही वाचा-

हे देखील वाचा