Monday, July 1, 2024

रणबीर कपुरने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य; म्हणाला, ‘माझ्यासाठी मुकेश अंबानी…’

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत असणारा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. नितेश तिवारींच्या या आगामी सिनेमाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच एका अवॉर्ड शो दरम्यान रणबीर कपुरने दिलाखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्याने त्याच्या यशामागचे रहस्य सांगत देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

अवॉर्ड शोमध्ये रणबीर म्हणाला, “मुकेश अंबानी माझ्यासाठी एक आदर्श आहेत. इतकेच नव्हे तर यावेळी त्याने अंबानी यांनी दिलेल्या सल्ल्याचादेखील खुलासा केला. ‘तुमचे यश असो किंवा अपयश त्यांना कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका’ असा सल्ला अंबानी यांनी रणबीरला दिला होता. तसेच, रणबीरने यावेळी त्यांच्या आयुष्यातील तीन मजबूत स्तंभांबद्दल सांगितले.
त्याच्या आयुष्याचा पहिला स्तंभ म्हणजे चांगले काम करणे, तसेच एक चांगला माणूस, दुसरा स्तंभ म्हणजे चांगला मुलगा आणि तिसरा चांगला भाऊ आणि चांगला मित्र बनणे.” असे तीन मजबूत स्तंभ असल्याचे रणबीर म्हणाला.

‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर खूप मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरने या चित्रपटासाठी नॉनव्हेज आणि दारू सोडल्याचं समोर आलं होतं. तर रामाच्या भूमिकेसाठी तो स्पेशल ट्रेनिंगही घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या मार्च महिन्यापासून या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे.

त ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवीबरोबरच रकुल प्रीत सिंहची वर्णी लागली आहे. रकुल या चित्रपटात शृपणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य अभिनेता यश ‘रामायण’मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मला तुला गमवायचे नाही, माझ अजूनही…’, ईशासाठी अजूनही तडफतोय अभिषेक
अक्षय कुमारच्या आधी अरबाज खानला आली होती ‘खिलाडी’ची ऑफर, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

 

हे देखील वाचा