बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या स्टाइलचे आणि लुक्सचे तर सर्वंजन चाहते आहेत. त्याचं सोशल मीडियावर अधिकृत अकाउंट नाहीये आणि सोशल मीडियाचा वापर तो करत नाही. त्याची बहीण रिद्धिमा कपूर, आई नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि प्रेयसी आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर रणबीरचे फोटो शेअर करत असतात. नुकताच रिद्धिमाने तिच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो, आत्या रितु नंदाचा मुलगा उद्योजक निखिल नंदासहित घरातील इतर सदस्यांसोबत रात्रीच्या जेवनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
या फोटोत रणबीरने स्टबलसोबत एक प्रिटेंट कॉलरवाला शर्ट घातला होती. तर त्याच्या बाजूला बसलेल्या त्याच्या बहीणीने टी-शर्ट परिधान केला होता. तसेच आत्या रितु नंदाचा मुलगा, उद्योजक निखिल नंदा कपूर परिवारासोबत रात्रीच्या जेवनाचा आनंद लुटताना दिसत आहे. हा फोटो रिद्धिमाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रेम आणि फक्त प्रेम.”
या इंस्टाग्राम पोस्टवर रणबीर आणि रिद्धिमाची चुलत बहीण अभिनेत्री करिश्मा कपूरनेही (Karishma Kapoor) प्रतिक्रिया दिली आहे. तिने फोटोवर लाल रंगाचा हार्ट इमोजी शेअर केला आहे. फोटो बघितल्यानंतर रणबीर-आलियाचे चाहते काही प्रश्न विचारत आहेत. ‘आलिया कुठे गायब होती’ आणि ‘आलिया कुठे आहे’ असे प्रश्न काही युजर्सने विचारले आहेत. काही युजर आलियाला मिस करताना दिसले.
नीतू कपूरनेही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रात्रीच्या जेवणातील परिवारासोबतचा फोटो शेअर केला आहे. रणबीर अखेरचा २०१८ मध्ये ‘संजू’ चित्रपटात दिसला होतो. आता लवकरच तो अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्टही मुख्य भूमिकेत दसणार आहे.
हेही वाचा